SurJyotsna Awards 2021: राज्यपालांकडून एकही असंवैधानिक कृत्य नाही; देवेंद्र फडणवीसांनी 'विमाना'वरून सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 19:24 IST2021-02-16T19:12:39+5:302021-02-16T19:24:47+5:30
Devendra Fadanvis Talk on Governor-Government allegations on Airplane : राज्यपाल कोश्य़ारी यांना उत्तराखंडला एका कार्यक्रमाला जायचे होते. यासाठी सकाळी ते विमानात देखील जाऊन बसले परंतू त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून विमान नेण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना विमानातून उतरावे लागले. नंतर ते खासगी विमानाने उत्तराखंडला पोहोचले.

SurJyotsna Awards 2021: राज्यपालांकडून एकही असंवैधानिक कृत्य नाही; देवेंद्र फडणवीसांनी 'विमाना'वरून सुनावले
गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान नाकारल्यावरून राजकारण तापले होते. शिवसेना विरोधात भाजपा असे द्वंद्व रंगले होते. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि सरकारवर टीका केली आहे. (Devendra Fadanvis Talk on Governor-Government allegations on Airplane)
राज्यपाल कोश्य़ारी यांना उत्तराखंडला एका कार्यक्रमाला जायचे होते. यासाठी सकाळी ते विमानात देखील जाऊन बसले परंतू त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून विमान नेण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना विमानातून उतरावे लागले. नंतर ते खासगी विमानाने उत्तराखंडला पोहोचले. यावर शिवसेनेने खासगी कार्यक्रमांना सरकारी विमान कसे मिळेल, असे कारण देत भाजपाच्या आरोपांना उत्तर देण्यात आले होते. यावर आता फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू मांडली आहे.
SurJyotsna Awards 2021: 'त्या' प्रश्नावर बाळासाहेब थोरात हसत हसत म्हणाले, 'आनंदी आनंद गडे'
राज्यपालांनी एकही असंवैधनिक कृत्य केलेलं नाही. राज्याचं सरकार सारंकाही स्वत:च्या मालकीचं असल्यासारखं वागतेय, असा आरोप फडणवीस यांनी केला. लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
SurJyotsna Awards 2021: राज्यात काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का?; अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...
संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात.