फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत प्रकरणाचा तपास नीट झाला असता; कंगनाची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 10:27 PM2020-09-14T22:27:54+5:302020-09-14T22:28:26+5:30

शिवसेनेचा पुन्हा सोनिया सेना म्हणून उल्लेख; कंगनाचे ठाकरे सरकारवरील हल्ले सुरुच

sushant singh case would be probe properly if we had devendra fadnavis as cm says kangana ranaut | फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत प्रकरणाचा तपास नीट झाला असता; कंगनाची 'मन की बात'

फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत प्रकरणाचा तपास नीट झाला असता; कंगनाची 'मन की बात'

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आक्रमक झालेल्या अभिनेत्री कंगना राणौतचे ठाकरे सरकारवरील हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्र सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचं मुंबईशी तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणारी कंगना दररोज ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा व्यवस्थित झाला असता, असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; PoKवरून हटेना, टार्गेट शिवसेना!

'माफियांचे लाड करणारी भ्रष्ट सोनिया सेना सत्तेत नसती, त्याजागी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर मुंबई पोलिसांना त्यांचं काम योग्यपणे करता आलं असतं, असं मी ठामपणे म्हणू शकते. फडणवीस मुख्यमंत्री असते, तर माध्यमांना आणि जनतेला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नसता,' अशा शब्दांत कंगनानं पुन्हा ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. या ट्विटमध्ये तिनं शेम ऑन महाराष्ट्र सरकार हॅशटॅग वापरला आहे.



मुंबईतून घरी परतताच मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
आज मुंबई सोडून चंदिगढला रवाना झालेल्या कंगनानं पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. कंगनानं ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली आहे. तिनं ट्विटमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे. 'मी मुव्ही माफिया, सुशांतचे मारेकरी आणि ड्रग रॅकेटला उघडं पाडतेय, हीच गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक ठरतेय. मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात, त्यांना मी उघडं पाडतेय, हीच त्यांची समस्या आहे. हाच माझा सर्वात मोठा गुन्हा आहे,' असं ट्विट कंगनानं केलं आहे. 



शिवसेनेचा पुन्हा सोनिया सेना म्हणून उल्लेख
याआधी कंगनानं शिवसेनेचा उल्लेख सोनिया सेना असा करत त्यांच्यामुळेच मुंबई सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं. 'चंदिगढमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिली आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. यावेळी मी वाचले, असं वाटतं. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीत उबदारपणा जाणवत होता आणि आज असा दिवस आहे, जेव्हा जीव वाचला म्हणजे खूप काही मिळाल्यासारखं वाटत आहे. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशत माजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे,' अशा शब्दांत कंगनानं शिवसेनेला लक्ष्य केलं होतं.

हाच माझा सर्वात मोठा गुन्हा; घरी परतलेल्या कंगनाचा पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा



मुंबईतून निघताना शेरोशायरीतून निशाणा
कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही कंगनाने म्हटले आहे.

Web Title: sushant singh case would be probe properly if we had devendra fadnavis as cm says kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.