वीज बिले माफीसाठी पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी पैसे कोठून आले? - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 04:40 PM2021-03-03T16:40:44+5:302021-03-03T16:48:40+5:30

Raju Shetty Swabimani Shetkari Sanghatna Kolhapur- लॉकडाऊनमुळे वर्षभर आमची मुले शाळा, महाविद्यालयात गेली नसताना, त्यांच्यावर फीची सक्ती केली जाते आणि राज्य सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल, तर ते खपवून घेणार नाही. यासह इंधन दरवाढ, लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफीसाठी लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका उडवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. गोरगरिबांची वीज बिले माफीसाठी सरकारकडे पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी पैसे कोठून आले? असा सवालही त्यांनी केला.

Swabhimani's statewide agitation erupts soon - Raju Shetty | वीज बिले माफीसाठी पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी पैसे कोठून आले? - राजू शेट्टी

वीज बिले माफीसाठी पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी पैसे कोठून आले? - राजू शेट्टी

Next
ठळक मुद्देस्वाभिमानीचा लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका - राजू शेट्टीविद्यार्थ्यांना फीची सक्ती, इंधन दरवाढीवर आक्रमक

कोल्हापूर : गोरगरिबांची वीज बिले माफीसाठी सरकारकडे पैसा नाही, मग मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी पैसे कोठून आले? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला असून इंधन दरवाढ, लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफीसाठी लवकरच राज्यभर आंदोलनाचा भडका उडवू, असा इशारा त्यांनी दिला.

लॉकडाऊनमुळे वर्षभर आमची मुले शाळा, महाविद्यालयात गेली नसताना, त्यांच्यावर फीची सक्ती केली जाते आणि राज्य सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

धनगर समाजाचे नेते, युवा उद्योजक संदीप कारंडे यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर संघटनेचा बिल्ला लावून स्वागत केले. त्यावेळी शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. 

एकीकडे केंद्र सरकार कृषी कायद्याच्या माध्यमातून आम्हाला उद्योगपतींचे गुलाम बनवत आहे, तर दुसरीकडे वीज दरवाढ करून राज्य सरकारने कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्यासाठी सहा महिने ओरडतोय. सत्तापिपासू भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत गेलो, म्हणजे त्यांनी कोणतेही निर्णय घेतले तर ते मान्य करायला आम्ही बांधील नाही.

शिक्षण संस्थाचालकांनी चालविलेल्या फीच्या सक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांचे कान ओढावेत. मुले महाविद्यालयात नाहीत, शिक्षकांना पगारही नाहीत, मग यांना फी लागते कशाला? लुटायचे तरी किती? आता गप्प बसणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Swabhimani's statewide agitation erupts soon - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.