विविध खेळांवर आधारित व्हिडीओंद्वारे भाजपचा विरोधकांवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 04:04 AM2019-04-22T04:04:53+5:302019-04-22T04:05:04+5:30
क्रिकेट, रस्सीखेच, कबड्डीचा समावेश
नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्याबाबत केंद्र सरकारकडे पुरावे मागणाऱ्या, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेय असण्याच्या प्रतिमेला आव्हान देणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांची खिल्ली उडविणारे अॅनिमेशन व्हिडीओ भाजपने रविवारी समाजमाध्यमांवर झळकविले आहेत. क्रिकेट, रस्सीखेच, कबड्डी अशा विविध खेळांच्या संकल्पनांचा आधार घेऊन हे व्हिडीओ बनविले आहेत.
विरोधी पक्षांमध्ये आपापसात जे मतभेद व गोंधळ आहे, तो जनतेला दाखविण्यासाठी हे व्हिडीओ बनविण्यात आल्याचे भाजप नेते अरुण जेटली व पियुष गोयल यांनी सांगितले. भाजपच्या टिष्ट्वटर हँडलवर झळकविलेल्या या व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. भ्रष्टाचार, दहशतवादाविरोधातील मुकाबला अशा विविध मुद्द्यांवर ते एकट्यानेच विरोधी पक्षांच्या नेत्यांशी मुकाबला करत असल्याचे या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळते.
क्रिकेटवर आधारित भाजपच्या अॅनिमेटेड व्हिडीओमध्ये मोदी यांनी षटकार लगावून मॅच जिंकण्यासाठी षटकार लगावल्याचे दाखविण्यात आले आहे. षटकार मारल्याची हाताने खूण करणाºया पंचांच्या निर्णयावर विरोधी पक्षांचे नेते आकांडतांडव करताना त्यात दाखविण्यात आले आहेत. या व्हिडीओबद्दल अरुण जेटली यांनी म्हटले आहे की, भारत जिंकला याचा पुरावा कोणताही भारतीय मागेल काय? पुरावे मागणाऱ्यांचा आम्ही पुन्हा पराभव करणार असून मोदी सरकारच केंद्रात पुन्हा सत्तेवर येणार आहे.
प्रचारमोहिमेच्या संकल्पनेनुसारच
दुसºया एका व्हिडीओत नरेंद्र मोदी एकट्यानेच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संघाशी कबड्डी खेळून त्यांना पराभूत करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
या व्हिडीओंसंदर्भात भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले की, भाजपचा संदेश लोकांना पटकन कळावा, म्हणून खेळांचा आधार घेऊनव पक्षाच्या प्रचारमोहिमेच्या संकल्पनेनुसारच हे व्हिडीओ बनविले आहेत.
फिर एक बार, मोदी सरकार हे भाजपच्या प्रचाराचे सूत्र आहे.