‘’ठाकरे सरकार विद्यार्थी विरोधी, MPSCच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू आहे खेळ’’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 09:27 AM2021-03-12T09:27:20+5:302021-03-12T09:36:14+5:30

Keshav Upadhye Criticize Maharashtra Government : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे विद्यार्थीविरोधी सरकार आहे. गेल्या वर्षी पदवी,अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ घालण्यात आला. त्यानंतर न्यायालयाला राज्य सरकारला  फटकारावे लागले.

"Thackeray government is anti-student, Fear of the future of MPSC students going dark" BJP Leader Keshav Upadhye Criticize Maharashtra Government | ‘’ठाकरे सरकार विद्यार्थी विरोधी, MPSCच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू आहे खेळ’’

‘’ठाकरे सरकार विद्यार्थी विरोधी, MPSCच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू आहे खेळ’’

Next

मुंबई - नुकत्याच आटोपलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी केल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून भाजपाने ठाकरे सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काल एमपीएससीच परीक्षा पुढे ढकण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर या आंदोलनात भाजपाने उडी घेतली आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या गोंधळावरून राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. राज्यातील आघाडी सरकार म्हणजे विद्यार्थीविरोधी सरकार असल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे. ("Thackeray government is anti-student, Fear of the future of MPSC students going dark" BJP Leader Keshav Upadhye Criticize Maharashtra Government )

या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकार म्हणजे विद्यार्थीविरोधी सरकार आहे. गेल्या वर्षी पदवी,अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ घालण्यात आला. त्यानंतर न्यायालयाला राज्य सरकारला  फटकारावे लागले. सध्या  १०वी आणि १२वीच्या परीक्षांचा घोळ सुरूच आहे. कोरोना काळातील शाळेतील फीबाबत अद्याप ठोस धोरण ठरवलेले नाही. त्यात आता MPSC च्या विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे. 

इतर मुद्द्यांवरूनही केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात की, समजातील विविध घटकांच्या विरोधात राज्य सरकार आहेच. जसं अव्वाचा सव्वा वीजबील पाठवून त्यात सवलत या सरकारने दिली नाही. शेतकऱ्यांना मदत दिली नाही. महिलांवर अत्याचारात वाढ झाली आहे. पण सरकारकडून त्याला रोखण्यासाठी कृती होत नाही. त्यात आता देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्य सरकार गेले आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला. 

दरम्यान, एमपीएसची परीक्षा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण देत पुढे ढकलण्यात आल्याने काल विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलन करत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना राज्याला संबोधित करत या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आश्वासन दिले होते.   

Web Title: "Thackeray government is anti-student, Fear of the future of MPSC students going dark" BJP Leader Keshav Upadhye Criticize Maharashtra Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.