"ती जखम अजून भरलेली नाही"; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:06 PM2024-09-09T17:06:12+5:302024-09-09T17:09:34+5:30

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीतील निकालाबद्दल बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवाबद्दल भाष्य केले. 

"That wound is not yet healed"; Dhananjay Munde hits out at uddhav Thackeray And sanjay raut | "ती जखम अजून भरलेली नाही"; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल

"ती जखम अजून भरलेली नाही"; धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली सल

Dhananjay Munde News : बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबर बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा ६ हजार मतांनी पराभव झाला. याच पराभवाबद्दल धनंजय मुंडे यांनी भाष्य केले. बीड शहरात अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात धनंजय मुंडे यांनी मनातील सल बोलून दाखवली. 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरला होता. या निकालाबद्दल कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत 6000 मतांनी आमची इज्जत गेली. ही खूप खोलवर झालेली जखम आहे. ती जखम अजून भरलेली नाही."

सामना अग्रलेखातून गोपीनाथ मुंडेंवर टीका, धनंजय मुंडेंनी दिले उत्तर

मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याचा मुद्दा सध्या महाविकास आघाडीत चर्चेत आहे. त्यावर भाष्य करताना सामना अग्रलेखात असे म्हटले आहे की, "संख्याबळाच्या आधारे नेता निवडणे, हे धोक्याचे ठरते. यात संख्याबळाच्या प्रकरणात भाजपने तीन निवडणुकांत शिवसेनेचे उमेदवार पाडले, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण हे शिवसेना आमदारांचा आकडा कमी कसा होईल, यास खतपाणी घालणारे होते. फडणवीसांनी तेच केले."

याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, "मला बोलायला अतिशय दुर्दैव वाटत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनाही वाईट वाटले असते. स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांची बदनामी करणे, हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. संजय राऊत शिवसेना पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत. मुंडे साहेब असताना काही बोलले नाहीत. ते नसताना त्यांच्याबद्दल बोलताना संजय राऊतांना लाज वाटली पाहिजे."

Web Title: "That wound is not yet healed"; Dhananjay Munde hits out at uddhav Thackeray And sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.