... म्हणून शरद पवार चिडले आणि म्हणाले ' मी काय म्हातारा झालोय''

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:30 PM2019-03-18T13:30:46+5:302019-03-18T13:32:25+5:30

‘या वयातही पवार साहेब दौरे करतात’, असे विधान चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार चिडले.

...that's why Sharad Pawar became angry and said, 'I am not old.' | ... म्हणून शरद पवार चिडले आणि म्हणाले ' मी काय म्हातारा झालोय''

... म्हणून शरद पवार चिडले आणि म्हणाले ' मी काय म्हातारा झालोय''

googlenewsNext

पिंपरी : ‘या वयातही पवार साहेब दौरे करतात’, असे विधान चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार चिडले. ‘मी काय म्हातारा झालोय. छप्पन इंचाची छाती दाखवित नसलो तरी अजूनही मनगटात ताकद आणि रग कायम आहे’, असा उपरोधिक टोलाही शरद पवारांनी अजित पवारांना मारला.

चिंचवड येथील सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वयातही शरद पवार दौरे करतात. जंग-जंग पछाडतात, असे विधान केले होते. त्यावर शरद पवार भाषणासाठी उभे राहिले. ते अजित पवारांवर चिडले. मला अजितचे म्हणने काही पटले नाही. तो काही वेळापूर्वी भाषणात म्हणाला, साहेब या वयातही दौरे करतात. हे काय? मी म्हातारा झालोय. मला अनेकदा अपघात झाले. पण मी माझे काम सोडले नाही. छप्पन इंचाची छाती कधी दाखविली नाही. मनगटात अजूनही ताकद आणि रग आहे. उत्साह कायम आहे. या वेळी काही लोक म्हटले साहेब निवडणूक नका लढवू म्हणून निवडणूक लढवित नाही. परंतु राज्यसभेवर आहेच. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘देशाचे कर्ज ५१ लाख कोटींवरून ८० लाख कोटींवर गेले. ३१ लाख कोटींचे कर्ज वाढविले गेले, कशासाठी? एक लाख कोटी रुपयांचा केलेल्या खर्चाचा हिशेब संसदेत दिला नाही. यावरून मोदी सरकारचा पारदर्शक कारभार लक्षात येईल.’’ ‘‘दिवसा इकडे आणि रात्री तिकडे हे खपवून घेतले जाणार नाही. मॅचफिक्सिंग तर कदापि सहन केली जाणार नाही.’’ असा सज्जड दम अजित पवार यांनी भरला.

Web Title: ...that's why Sharad Pawar became angry and said, 'I am not old.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.