'...तर राजकीय संन्यास घेईन', भाजपाच्या आरोपानंतर उदय सामंत यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 03:07 PM2021-08-26T15:07:16+5:302021-08-26T15:09:08+5:30

Uday Samant : नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

'... then I will retire politically', Uday Samant announced after the BJP's allegation | '...तर राजकीय संन्यास घेईन', भाजपाच्या आरोपानंतर उदय सामंत यांचं विधान

'...तर राजकीय संन्यास घेईन', भाजपाच्या आरोपानंतर उदय सामंत यांचं विधान

Next

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे पाहायला मिळाले, तर भाजपा नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसत आहे. यातच सिंधुदुर्गमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी ही जमाव बंदी लागू केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

दरम्यान, नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच, नारायन राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेमुळे मी जमाव बंदीचे आदेश दिले, हे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे विधान उदय सामंत यांनी केले आहे.

उदय सामंत आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी उदय सामंत एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले,"कोणाचा तरी दौरा आहे म्हणून आहे म्हणून मी रत्नागिरी दौऱ्यावर आहे, असे काही नाही, तो केवळ योगायोग समजावा. गेली तीन दिवस मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या वेळापत्रकाला अनुसरून आम्ही दौरे लावले नाहीत. तसेच कालची जी कारवाई होती ती कायदेशीर होती." 

उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान
प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु हा पक्ष वाढवत असतांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याचा अभिमान असतो. तसा आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान आहे. गर्व देखील आहे. मुख्यमंत्री म्हणून ते अतिशय चांगल काम करत आहेत. कदाचित देशाच्या क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्धव ठाकरे आल्यामुळे काही लोकांना ते आवडले नसेल, असे उदय सामंत म्हणाले. 

'...तर राजकीय संन्यास घेईन'
जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमाव बंदी लागू केल्याचा आरोपावर उदय सामंत यांनी भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, भाजपाने खोटे आरोप केले आहेत. याचे पुरावे सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे सामंत म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना स्वायत: अधिकार आहेत ते प्रशासनाचे प्रमुख आहेत. जिल्हादंडाधिकारी देखील आहे, त्यामुळे त्यांना वाटले असेल की कलम १४४ सिंधुदुर्गमध्ये लावणे आवश्यक आहे. ते गणपतीच्या पार्श्वभूमीवर किंवा इतर कोणत्या पार्श्वभूमीवर असेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

राणेंची जन आशीर्वाद यात्रा 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तेथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपाकडून देशभर जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे.

Web Title: '... then I will retire politically', Uday Samant announced after the BJP's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.