‘...तर पोलीस तपासणार भाजपाचे ड्रग्ज कनेक्शन’; काँग्रेस शिष्टमंडळाला गृहमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 07:02 AM2020-10-17T07:02:46+5:302020-10-17T07:03:10+5:30

Drugs Connection with BJP News: भाजप आणि बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे आणि माहितीवर एनसीबीने कार्यवाही केली नाही.

‘... then police will check BJP's drug connection’; Home Minister's assurance to the Congress | ‘...तर पोलीस तपासणार भाजपाचे ड्रग्ज कनेक्शन’; काँग्रेस शिष्टमंडळाला गृहमंत्र्यांचे आश्वासन

‘...तर पोलीस तपासणार भाजपाचे ड्रग्ज कनेक्शन’; काँग्रेस शिष्टमंडळाला गृहमंत्र्यांचे आश्वासन

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांच्या चौकशीतूनही काहीच निष्पन्न झाले नाही. शिवाय, बॉलीवूड आणि भाजपच्या ड्रग्ज कनेक्शनचीही चौकशी एनसीबीकडून होत नसल्याची तक्रार काँग्रेस शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. यावर, एनसीबीने तपास न केल्यास मुंबई पोलिसांकडून याचा तपास करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.

काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात गृहमंत्री देशमुख यांची भेट घेतली. बॉलीवूड आणि भाजप ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने ३१ आॅगस्टला केली होती. आज याच मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. त्याला गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सावंत यांनी सांगितले.

सावंत म्हणाले की, भाजप आणि बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे आणि माहितीवर एनसीबीने कार्यवाही केली नाही. चित्रपट निर्माता संदीप सिंह आणि विवेक ओबेरॉय यांचे नाव येत होते. ड्रग्ज कनेक्शनसंदर्भात बंगळुरू पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही, याचे आश्चर्य वाटते.

कर्नाटकमध्ये भाजपच्या प्रचारात सामील झालेली अभिनेत्री रागिनी द्विवेदी ही चंदन ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये पकडली गेली आहे. तिच्याबरोबर १२ लोकांवर ड्रग्ज पेडलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १२ लोकांमध्ये आदित्य अल्वा नावाचा व्यक्ती असून तो फरार आहे. तो विवेक ओबेरॉयचा सख्खा मेव्हणा आहे. ही सर्व माहिती चौकशीकरिता दिली होती, परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र भाजप कार्यालयात संदीप सिंहने ५३ वेळा कोणाला फोन केला याचे उत्तरही अजून मिळालेले नाही, असेही सावंत म्हणाले.

Web Title: ‘... then police will check BJP's drug connection’; Home Minister's assurance to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.