"...तर पुन्हा दिल्लीत घुसावे लागेल, बॅरिकेट्स तोडावे लागतील’’, राकेश टिकैत यांची आंदोलकांना चिथावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:29 PM2021-03-24T19:29:07+5:302021-03-24T19:33:58+5:30
Farmers Protest : शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिथावणीखोर आवाहन केले आहे. पुन्हा दिल्लीत घुसावे लागेल. पुन्हा बॅरिकेड्स तोडावे लागतील, असे राकेश टिकेत यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता शंभर-सव्वाशे दिवस उलटून गेले आहेत. (Farmers Protest) मात्र कृषी कायद्यांवर दोन्ही पक्षांमध्ये समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. याचदरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिथावणीखोर आवाहन केले आहे. पुन्हा दिल्लीत घुसावे लागेल. पुन्हा बॅरिकेड्स तोडावे लागतील, असे राकेश टिकेत यांनी म्हटले आहे. राकेश टिकैत सध्या कृषी कायद्यांविरोधात जनजागृतीसाठी देशातील विविध राज्यांमध्ये किसान महापंचायतींचे आयोजन करत आहेत. ("... then we will have to re-enter Delhi, barricades will have to be broken", Rakesh Tikait provokes the protesters)
मंगळवारी जयपूरमध्ये किसान महापंचायतीमध्ये राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर जोरदा निशाणा साधला. ते म्हणाले की, केंद्र सरकार लोकांमध्ये जातीधर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. मात्र आता अन्नदाता फुटणार नाही. तसेच गरज पडल्यास तो संसदेमध्ये येऊन आपले धान्य विकून दाखवेल. आता शेतकऱ्यांना जेव्हा दिल्लीच्या दिशेने कूच करण्यास सांगितले जाईल तेव्हा त्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच करावी. दिल्लीचे बॅरिकेड्स पुन्हा तोडावे लागतील, असे आवाहन टिकैत यांनी केले.
किसानों को फिर दिल्ली में घुसना होगा और बैरिकेड तोड़ने होंगे- राकेश टिकैत
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) March 24, 2021
कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत इशारा करताना राकेश टिकैत म्हणाले की, संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना आता जागे व्वाहे लागेल. विशेषकरून तरुणांनी आता पुढाकार घेऊन लढले पाहिजे. या देशात जय श्री राम आणि जय भीमच्या घोषणा एकत्र दिल्या जातील, तेव्हा देश वाचेल, असेही त्यांनी सांगितले.