तिसरा टप्पा: ३९२ उमेदवार कोट्यधीश, ११ जणांची मालमत्ता शून्य; २३ अंगठेबहाद्दर, ७८८ पाचवी ते बारावी शिकलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 03:32 AM2019-04-23T03:32:34+5:302019-04-23T03:33:01+5:30
१८३ उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली नाही पॅनकार्डची माहिती
नवी दिल्ली : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ टक्के उमेदवार करोडपती असून ज्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही असे ११ उमेदवारही रिंगणात आहेत. एकूण ३९२ उमेदवार करोडपती असून त्यात समाजवादी पार्टीचे ९ (९० टक्के), भाजपचे ८४ टक्के, कॉँग्रेसचे ८२ टक्के उमेदवार आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेसचे ७०%, माकपाचे ५३ %, सेनेचे ४१ % तर बसपाचे १३ % कोट्यधीश आहेत. उमेदवारांची सरासरी मालमत्ता २.९५ कोटी आहे.
बहुजन मुक्ती पार्टीचे जे. पी. लडाकभाई, भारतीय ट्रायबल पार्टीचे बी. वन्साभाई खुलत, नवसर्जन भारत पार्टीचे एच. आर भानाभाई, भारतीय पीपल्स पार्टीचे शंकर जाधव यांच्यासह अन्य सात अपक्षांनी आपल्याकडे शून्य मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधील सपाचे उमेदवार देवेंद्र सिंह यादव यांची मालमत्ता २०४ कोटी असून ती या टप्प्यातील सर्वाधिक आहे. यापाठोपाठ राष्टÑवादीचे साताºयामधील उमेदवार उदयनराजे भोसले (१९९ कोटी) व बरेलीचे कॉँग्रेस उमेदवार प्रवीण सिंह आरोन (१४७ कोटी) हे कोट्यधीश आहेत. १८३ उमेदवारांनी पॅनकार्डची माहिती दिलेली नाही. असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने तिसºया टप्प्यात होत असलेल्या ११७ मतदारसंघांतील १६०० उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून हा अहवाल जारी केला आहे.
२३ अंगठेबहाद्दर
२३ अंगठेबहाद्दर उमेदवारही आहेत. ४९% (७८८) उमेदवारांचे शिक्षण पाचवी ते १२वी दरम्यान आहे तर ४३% (६७१) उमेदवार हे पदवीपर्यंत शिकलेले आहेत. या टप्प्यातील सर्वाधिक ७६० (४८%) उमेदवार हे ४१ ते ६० वयोगटातील असून त्याखालोखाल ३५% (५६२) उमेदवार २५ ते ४० वयोगटातील आहेत. १७% (२६५) उमेदवार ६१ ते ८० वयोगटातले असून तीन उमेदवारांचे वय ८० वर्षांहून अधिक आहेत. चार उमेदवारांनी आपले वय नमूद केलेले नाही.
230 उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे आहेत. ३० जणांविरुद्ध खुनाचे, १४ जणांविरुद्ध अपहरणाचे तर २९ उमेदवारांच्या विरोधात महिलांबाबतच्या अत्याचाराचे गुन्हे आहेत.
63 मतदारसंघ हे संवेदनशील आहेत. ज्या मतदारसंघामध्ये तीन किंवा त्याहून जास्त उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात असे मतदारसंघ संवेदनशील मानले जातात.
तिसºया टप्प्यातील जागांचा आढावा
आसाम : ४
एआययूडीएफ :
डुबरी, बारपेटा
अपक्ष : कोकराझार
भाजप : गुवाहाटी
ओडिशा : ६
बिजद : पुरी, भुवनेश्वर, कटक, धेनकनाल, संबलपूर, केनझाल.
बिहार : ५
भाजप : झांजरपूर
कॉँग्रेस : सुपौल
राजद : अरारिया, माधेपुरा
लोजसपा : खगरिया
छत्तीसगड : ७
भाजप : कोरबा, सरगुजा, बिलासपूर, रायपूर, रायगढ, झांजगिर : चंपा,
कॉँग्रेस : दुर्ग
गुजरात : २६
भाजप : कच्छ, बनासकांठा,
पाटण, मेहसाणा, साबरकांटा, गांधीनगर
अहमदाबाद (पूर्व), अहमदाबाद (पश्चिम), सुरेंद्रनगर, राजकोट, पोरबंदर, जामनगर, जुनागड, अमरेली, भावनगर, आणंद, खेडा, पंचमहाल, दाहोद, वडोदरा, छोटा उदयपूर, भरूच. बारडोली, सुरत, नवसारी, बलसाड
गोवा : २
भाजप : उत्तर गोवा, दक्षिण गोवा
जम्मू-काश्मीर : १
पीडीपी : अनंतनाग
कर्नाटक : १४
भाजप : बागलकोट, बेळगाव, विजापूर, बिदर, कोप्पळ, दावणगेरे, शिमोगा
कॉँग्रेस : चिक्कोडी, गुलबर्गा, रायचूर, बेल्लारी, हावेरी, धारवाड, उत्तर कन्नड
केरळ : २०
कॉँग्रेस : अळपुळा अर्नाकुलम, कोळीकोड मावेलीक्कारा, पटणमतिट्टा, तिरुअनंतपूरम, वडक्कडा,
वायनाड
माकपा : अलाथूर, अतिंगल, कन्नूर, कासारगोड, पलक्कड
भाकप : त्रिसूर
आरएसपी : कोल्लम
मुस्लीम लीग : पोन्नानी, मल्लापूरम
अपक्ष : चलकुडी, इडुक्की
अन्य : कोट्टायम
त्रिपुरा : १
माकपा : त्रिपुरा पूर्व
उत्तर प्रदेश : १०
भाजप : मोरादाबाद, रामपूर, पिलभित, बरेली, आयोना, बदाऊन, संबल, इटाह
सपा : मैनपुरी, फिरोजाबाद
प. बंगाल : ५
तृणमूल कॉँग्रेस : बालूरघाट
कॉँग्रेस : जांगीपूर, माल्डा उत्तर, माल्डा दक्षिण
माकपा : मुर्शिदाबाद
दादरा नगर
हवेली : १
भाजप :
दादरा नगर हवेली
दमण-दीव : १
भाजप : दमण-दीव
तिसºया टप्प्यात गाजलेले मुद्दे
या टप्प्यातही निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञासिंह, मिलिंद देवरा, मुख्तार अब्बास नक्वी आदींच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या नोटीस जारी केल्या.
प्रचारादरम्यान, भाजपचे भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलचे आणि बाबरी मशीद पाडल्याचे वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
हार्दिक पटेल यांच्यावर सभेत एका व्यक्तीने कानशिलात मारली तर नोटाबंदीवरून भाजप नेत्यावर जोडा फेकण्यात आला.