ज्यांना भारतातील विविधता स्वीकारार्ह नाही, त्यांना देशभक्त म्हटलं जातंय- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 05:49 PM2019-04-06T17:49:29+5:302019-04-06T17:55:16+5:30

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

those who do not accept diversity are being called patriots today says sonia gandhi | ज्यांना भारतातील विविधता स्वीकारार्ह नाही, त्यांना देशभक्त म्हटलं जातंय- सोनिया गांधी

ज्यांना भारतातील विविधता स्वीकारार्ह नाही, त्यांना देशभक्त म्हटलं जातंय- सोनिया गांधी

Next

नवी दिल्ली- काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोनिया गांधींनी मोदींवर टीका केली आहे. मोदी सरकारनं अनेक संस्थांना संपवल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास संविधानाला पूर्वीसारखंच गतवैभव प्राप्त करून देऊ, काही जणांना देशभक्तीची नवी व्याख्या शिकवली जात आहे. विचारांच्या आधारवर स्वतःच्याच देशातल्या नागरिकांशी भेदभाव करत आहेत.

काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी आपण विचारही करू शकत नव्हतो की, अशी परिस्थिती येणार आहे. गेल्या काही काळापासून आपल्या देशातील मूळ आत्म्याला एका विचारधारेच्या आडून तुडवलं जातंय. ज्या संस्थांना आम्ही प्रगतिपथावर आणून मजबूत केलं, त्या सर्वांनाच मोदी सरकारनं जवळजवळ संपवल्यात जमा आहे. 65 वर्षात मेहनत करून तयार केलेल्या जनकल्याणाच्या मूल संरचना भाजपानं संपवण्याचं काम केलं आहे.

आज देशभक्तीची नवी परिभाषा शिकवली जातेय. देशातील विविधता स्वीकार न करणाऱ्यांना देशभक्त म्हटलं जातंय. धर्म आणि विचारधारेच्या आधारवर देशातील नागरिकांमध्ये करण्यात येत असलेल्या भेदभावाला मोदी सरकार योग्य ठरवत आहे. देशातील कायदा-सुव्यवस्था बिघडलेली असून, मोदी सरकारला ती रुळावर आणायची नसल्याची टीका सोनियांनी केली आहे. काही वेळापूर्वी काँग्रेस उमेदवार डॉली शर्मा यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रोड शोमधून प्रियंका गांधींनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी खोटं बोलत आहेत.

भाजपाच्या पाच वर्षातल्या कार्यकाळातील एकाही यशस्वी कामाबद्दल ते सांगू शकत नाहीत. ते आमच्या परिवाराचा द्वेष करतात. ते म्हणतात, नेहरूंनी हे केलं, इंदिरांनी ते केलं, पण मोदीजी तुम्ही काय केलं?, पाच वर्षांत देशातील कोणती कामं केली?, असा प्रश्नही प्रियंका गांधींनी उपस्थित केला आहे. जीटी रोडवरून काढलेला रोड शो संपल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. त्या म्हणाल्या, स्वतःचा लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीत मोदी कधीही कोणत्या गावात गेलेले नाहीत, ते फक्त इथे येऊन भाषणं ठोकतात.

Web Title: those who do not accept diversity are being called patriots today says sonia gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.