'घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले', भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 10:07 PM2021-08-08T22:07:28+5:302021-08-08T22:27:03+5:30

Keshav Upadhye : सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले, असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

three-wheeler government at home succumbs to local struggle, BJP Leader criticised the State government | 'घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले', भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

'घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले', भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, यावरून भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, "भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लसीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही?" असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला.

याचबरोबर, "सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!", असे दुसरे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे, 

दरम्यान, कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. तर भाजपाने सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा, यासाठी आंदोलन केले होते. 

'१५ ऑगस्टपासून नागरिकांना करता येणार लोकल प्रवास'
कोरोना काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगितले. 


ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. सर्वात महत्वाचे म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.



-

Web Title: three-wheeler government at home succumbs to local struggle, BJP Leader criticised the State government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.