गरिबीचे भांडवल करणाऱ्यांना हटवण्याची वेळ - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:39 AM2019-04-22T05:39:21+5:302019-04-22T05:40:06+5:30
गांधी घराण्याचा कुटील डाव ओळखून त्यांना घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.
सांगोला (जि़ सोलापूर) : साठ वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाºया काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने फक्त जवळच्या नेत्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग, डी. एड., बी. एड. कॉलेज व माध्यमिक शाळांच्या खिरापती वाटून डोनेशनच्या माध्यमातून पुढाऱ्यांची गरिबी हटविली, पण देशातील सर्वसामान्य नागरिकांची गरिबी हटली नाही़ त्यांनी केवळ गरिबीचे राजकीय भांडवल केले़ त्यामुळे अशा गांधी परिवारालाच हटविण्याची वेळ आली आहे, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली़
गडकरी म्हणाले, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातील गरिबी हटवू, असे आश्वासन दिले आहे. गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसने देशाला केवळ गरिबीच्या नावाने फसविले आहे. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता राहुल गांधी हे सुद्धा देशातील गरिबीचेच राजकारण करु पाहत आहेत. गांधी घराण्याचा कुटील डाव ओळखून त्यांना घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.
आता बारामतीकरांची जनताच जिरवणार
माढा मतदारसंघातील जनता ही केवळ मतदार नसून ती वानरसेना आहे. या सेनेने राष्ट्रवादीच्या सेनापतीला लढाईला सुरुवात होण्यापूर्वीच मैदानातून पळवून लावले आहे. आजपर्यंत माढा मतदारसंघाला गोचिडाप्रमाणे चिकटलेल्या बारामतीकरांची या निवडणुकीत सांगोल्यातील जनता चांगलीच जिरवेल, असे पाशा पटेल म्हणाले.