"नेपाळ, श्रीलंकेतही येणार भाजप सरकार; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 08:35 AM2021-02-15T08:35:31+5:302021-02-15T08:36:19+5:30

श्रीलंका, नेपाळमध्ये पक्षविस्तार करण्याची योजना अमित शहांकडे आहे. त्या देशांमध्येही भाजपचं सरकार येईल, असं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटलं.

Tripura CM Biplab Deb Says Amit Shah Shared Plans For BJP Expansion To Nepal, Lanka | "नेपाळ, श्रीलंकेतही येणार भाजप सरकार; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार"

"नेपाळ, श्रीलंकेतही येणार भाजप सरकार; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार"

Next

अगरताळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बिप्लब कुमार देब (Tripura CM Biplab Deb) कायम त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आता देब यांनी भाजपच्या विस्ताराबद्दल एक विधान केलं आहे. सध्या हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप पुढील काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर  विस्तार करेल, असं देब म्हणाले. अगरताळ्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपच्या विस्तार योजनेवर बोलताना देब यांनी गृहमंत्री अमित शहांसोबत झालेल्या एका बैठकीचा संदर्भ दिला.

"भाजपा सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित; रिंकू शर्माच्या हत्येला अमित शहा जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा"

भाजपनं केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही विस्तार करण्याची योजना आखली आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचं सरकार स्थापन करण्याची योजना शहांकडे आहे, असं देब यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सांगितलं. २०१८ मध्ये त्रिपुरामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी झालेल्या एका बैठकीत झालेल्या संवादाचा तपशील यावेळी देब यांनी दिला. 'विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षानं बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला अमित शहा उपस्थित होते. त्यावेळी पक्षाचं नेतृत्त्व शहांकडे होतं,' असं देब म्हणाले.

शाह आणि अधीर यांच्यात वार-पलटवार, 'मुर्गी-अंडा-मुर्गी' वक्तव्यावर लोकसभेत एकच हशा!

'तीन वर्षांपूर्वी झालेल्या त्या बैठकीत शहांनी परदेशातील विस्ताराच्या योजनेवर भाष्य केलं होतं. त्यावेळी आम्ही अतिथीगृहात बसलो होतो. पक्षाचे ईशान्य झोनचे सचिव अजय जम्वाल बैठकीला हजर होते. भाजपनं अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्याचं ते म्हणाले. त्यावर श्रीलंका आणि नेपाळ अद्याप शिल्लक असल्याचं शहांनी म्हटलं. आपल्याला पक्षाचा विस्तार करायचा आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत सरकार स्थापन करण्यासाठी पक्षविस्तार करायचा आहे, असं त्यावेळी शहा म्हणाले होते,' असं देब यांनी उपस्थितांना सांगितलं.

यावेळी देब यांनी अमित शहांच्या नेतृत्त्वाची मुक्तकंठानं स्तुती केली. अमित शहांच्या नेतृत्त्वाखाली भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष झाल्याचं ते म्हणाले. 'केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलतं. डावे आणि काँग्रेस आलटून पालटून सत्तेत येतात. पण हा ट्रेंड भाजप बदलेल. केरळमध्ये भाजपचं सरकार येईल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करून भाजप सत्ता स्थापन करेल, असंदेखील देब म्हणाले.

Web Title: Tripura CM Biplab Deb Says Amit Shah Shared Plans For BJP Expansion To Nepal, Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.