हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 12:03 PM2021-02-05T12:03:52+5:302021-02-05T12:04:48+5:30

Ashish Shelar : शिवसेना सध्या अमिबालाही लाज वाटेल, अशा भूमिका घेत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

The true teachings of Hindutva should be taken to Nagpur, Ashish Shelar told Uddhav Thackeray | हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला 

हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला 

Next
ठळक मुद्देमुंबईतून शरजीलला पळून जाण्यास कुणी मदत केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आशिष शेलार म्हणाले. 

मुंबई : हिंदुत्वाची खरी शिकवण मिळते ती नागपूरच्या कार्यालयात, आपण याआधी सतत भेटलो आहोत. आताही त्याठिकाणी जाऊन यावे, असा टोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरम्यान, एकीकडे हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते, तेव्हा तो निर्माणही होतो, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले होते. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाला बाजूला ठेवायच्या कुहेतूचा पर्याय म्हणून दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन जे सत्तेत आले, त्यांना हे बोलणे शोभत नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

याचबरोबर, एल्गार परिषदेत काही ना काही गडबड होते व धार्मिक भावना दुखावल्या जातात, अशी पार्श्वभूमी असतानाही परवानगी का दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यापर्यंत आणि मुंबईतून शरजीलला पळून जाण्यास कुणी मदत केली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आशिष शेलार म्हणाले. 

याशिवाय, शिवसेनेची कृषी कायद्यावरून राज्यसभेत एक भूमिका, लोकसभेत वेगळी भूमिका, आझाद मैदानात आणि आघाडीच्या बैठकीतही वेगवेगळी भूमिका आहे. शिवसेना सध्या अमिबालाही लाज वाटेल, अशा भूमिका घेत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
"मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपापासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपाने घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे. एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो,"असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात, असे सूचित केले आहे.
 

Web Title: The true teachings of Hindutva should be taken to Nagpur, Ashish Shelar told Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.