दिग्गजांच्या प्रचारसभा ठरणार टर्निंग पॉइंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:55 PM2019-04-14T23:55:30+5:302019-04-14T23:55:54+5:30

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराच्या तोफा धडधडू लागल्या आहेत.

Turning Point to be a big publicity meeting | दिग्गजांच्या प्रचारसभा ठरणार टर्निंग पॉइंट

दिग्गजांच्या प्रचारसभा ठरणार टर्निंग पॉइंट

Next

- आविष्कार देसाई 
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराच्या तोफा धडधडू लागल्या आहेत. नजीकच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा अखेरच्या टप्प्यात पार पडणार आहेत. हे सर्व दिग्गज नेते एकमेकांवर कोणते आरोप-प्रत्यारोप करतात, कोणती आश्वासने देतात. याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात खऱ्या अर्थाने प्रचार तोफांना त्यांच्याकडूनच बत्ती दिली जाणार असल्याने त्यांच्या प्रचारसभा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचे बोलले जाते.
गीते आणि तटकरे दोन्ही उमेदवारांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेचे केली आहे. दोघांच्या सभांना गर्दी होताना दिसत आहे. गीते यांची ओळखही सदाचारी नेता अशी आहे, तसेच मी कोणावरही वैयक्तिक टीका करत नाही, असे ते आवर्जून सांगतात. मात्र, अलीकडेच त्यांच्या प्रचाराचा आणि एकूणच भाषणाचा रोख हा बदलल्याचे दिसून येते.
गीते यांनी गेल्या ३० वर्षांत आणि मंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या कालावधीत नक्की कोणता विकास केला, असा प्रश्न तटकरे त्यांना जाहीर सभांमधून करत आहेत. गीतेंनी विकासच केलेला नाही, त्यामुळेच त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखे काहीच शिल्लक नसल्याने टीका करत असल्याचे प्रतिउत्तर तटकरे हे देत आहेत.


विकासाच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर या, असे आवाहनही ते गीते यांना देत आहेत. रायगड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे दोन्ही नेते सांगत आहेत. मात्र, शिवसेनेने छापलेले आणि निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडलेले सिंहावलोकन या पुस्तकात गीतेंनी केलेल्या विकासकामाचा तपशील दिला आहे. त्यावरच तटकरे यांनी आक्षेप घेत राष्ट्रवादीने आणलेला विकासनिधी गीतेंनी त्यांच्या पुस्तकात छापल्याचे उघड केले आहे. झोतीरपाडा येथे समाजमंदिर बांधल्याचा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र, त्या गावात समाजमंदिर झालेच नसल्याचा खुलासा तटकरे यांनी अलिबाग येथील प्रचारसभेत केला होता.

>नेते मंडळीं नेमके काय बोलणार?
मनसेप्रमुख राज ठाकरे हे थेट कोणाच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेले नाहीत. तसेच त्यांच्या पक्षाचा उमेदवारही निवडणूक लढवत नाही. त्यामुळे सभांचा खर्च नेमका कोणत्या पक्षाच्या उमेदवारांच्या खर्चात धरायचा असा अशा संभ्रमात निवडणूक विभाग आहे. माणगाव येथे गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हे सर्व दिग्गज नेते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Turning Point to be a big publicity meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.