Twitter वर युजर्सच्या चॅलेंजला रिप्लाय देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला सर्वांनाच धक्का
By प्रविण मरगळे | Published: January 16, 2021 10:14 AM2021-01-16T10:14:23+5:302021-01-16T10:17:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर दोन अकाऊंट्स आहेत, त्यातील पहिलं अकाऊंट पंतप्रधान कार्यालयाचं(PMO) नावानं आहे तर दुसरं स्वत: नरेंद्र मोदी यांच्या नावाने आहे.
नवी दिल्ली – सोशल मीडियात असा प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी रोज काही ना काही नवीन ट्रेंड सुरू असतो, अनेक माहिती मिळत असते, माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर अनेक जण एक्टिव्ह असतात, यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी असो वा अन्य नेते ट्विटर, फेसबुक या सोशल मीडियावर साइटवर सक्रीय असल्याचं दिसून येते, कोणत्याही सणाच्या शुभेच्छा, शोकसंदेश, दिवसभरातील अपडेट्स या माध्यमातून शेअर केले जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर दोन अकाऊंट्स आहेत, त्यातील पहिलं अकाऊंट पंतप्रधान कार्यालयाचं(PMO) नावानं आहे तर दुसरं स्वत: नरेंद्र मोदी यांच्या नावाने आहे. ट्विटरवर पंतप्रधान सक्रीय असतात. शुक्रवारी एका युजर्सला प्रश्नाला चक्क नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं, या युजरने एका मंदिराचा फोटो अपलोड केला होता, हा कोणत्या मंदिराचा फोटो आहे ओळखून दाखवा असं आव्हान त्याने ट्विटरवर दिलं होतं, पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं उत्तर देत लोकांना आश्चर्यचकीत केले.
लॉस्ट टेंपल्स नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर केला होता, ज्यात गंगा नदीच्या किनारी सुंदर मंदिर दिसत आहे. त्याठिकाणी गंगा मातेची आरती सुरू आहे, हा फोटो शेअर करत युजरने अमेरिकन लेखक मार्क ट्वेनने संबंधित शहराचा उल्लेख केला होता ते लिहिलं होतं, इतिहासापेक्षा जुनं, परंपरेपेक्षा जुनं तुम्ही या शहराला ओळखू शकता का? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिप्लाय दिला आहे.
I surely can. :)
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2021
Had shared this picture a few years ago.
This is Kashi's Ratneshwar Mahadev Temple, in its full glory. https://t.co/xp3u9iF1rHhttps://t.co/7NkPccOeYj
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय की, मी निश्चितपणे हे ओळखू शकतो, मला आठवतंय की, काही वर्षापूर्वी मी हे फोटो शेअर केले होते, हे काशीच्या रतनेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१७ मधील फोटो शेअर केले आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटला काही मिनिटांतच हजारो लाइक्स मिळाले होते, सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या पोस्टला २ हजार कमेंट्स, १२ हजार रिट्विट आणि ७२ हजारांहू अधिक लोकांनी पसंत केले आहे.