उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार; भाजपला टीकांचा 'भारतरत्न' द्या: संजय राऊत

By मोरेश्वर येरम | Published: December 22, 2020 04:22 PM2020-12-22T16:22:21+5:302020-12-22T16:24:21+5:30

भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात, असं संजय राऊत म्हणाले.

uddhav Thackeray to be PM Give Bharat Ratna to BJP for criticism says Sanjay Raut | उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार; भाजपला टीकांचा 'भारतरत्न' द्या: संजय राऊत

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार; भाजपला टीकांचा 'भारतरत्न' द्या: संजय राऊत

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोलउद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी अनेकांची इच्छा असल्याचं राऊत यांचं वक्तव्यटीका करण्याचं 'भारतरत्न' भाजपला द्यायला हवं, असा टोला राऊत यांनी लगावला

मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केल्यावर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 

"भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात. टीका करणाऱ्या भाजपच्या लोकांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

"टीका करणाऱ्यांना लोकं मारायची आहेत. तर मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लादण्यात मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही", असंही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार
आगामी काळात अनेक राजकीय भूकंप होणार असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. "महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही आमदार फुटणार नाही असं विरोधक म्हणत होते. पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय ते दिसेल. भविष्यात तो भूकंप होईल त्याचं केंद्रस्थान शिवसेना भवन असेल", असं संजय राऊत यांनी सांगितलं. 

उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी अनेकांची इच्छा आहे. शिवसेना फक्त पक्ष नाही, सेना एक कुटुंब आहे आणि बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख आहेत. आजही उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करत आहेत, असंही राऊत म्हणाले. 
 

Web Title: uddhav Thackeray to be PM Give Bharat Ratna to BJP for criticism says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.