Farmer Protest: मुख्यमंत्र्यांचा आदेश, खासदार संजय राऊत आज गाझीपूर बॉर्डरवर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 08:50 AM2021-02-02T08:50:05+5:302021-02-02T08:52:59+5:30
Sanjay Raut will visit Farmer Protest gazipur border : मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. महाविकास आघाडीने शेतकऱी हिताचे अनेक निर्णय घेतले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यसभा खासदार संजय राऊत आज आंदोलक शेतकऱ्यांना भेटणार आहेत.
महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत.@OfficeofUT@PawarSpeaks@AUThackeray
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
याची माहिती राऊत यांनीच ट्वीट करून दिली आहे. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. महाविकास आघाडीने शेतकऱी हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील शेतकरी आंदोलकांना भेटणार असल्याचे ट्विट राऊत यांनी केले आहे.
यानंतर काही वेळातच राऊत यांनी आज गाझीपूरच्या शेतकऱ्यांना दुपारी 1 वाजता भेटणार असल्याचे ट्विट केले.
किसान आंदोलन झिंदाबाद!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 2, 2021
will visit protesting farmers at Gazipur today at 1 pm..
जय जवान
जय किसान!
शेतकऱ्यांशी चर्चेचा ऑलिंपिक गेम सुरुय का? संजय राऊतांनी व्यक्त केला संशय
केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चेचा पहिले राऊंड, दुसरे राऊंड असे विक्रम करतेय. हा काही ऑलिम्पिक गेम सुरु आहे का? आशियाई गेम सुरु आहे का, खरेतर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता. गेल्या ६० दिवसांपासून पंजाब. हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारताना संशयही व्यक्त केला आहे. पहिल्या राऊंडमध्येच न्याय मिळायला हवा होता. मला असे वाटतेय की यामागे एक अदृष्य शक्ती आहे. जिला देशातील वातावरण बिघडवायचे आहे. तसेच आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपाने तेव्हाच निर्णय घेतला असता तर त्याचा त्यांनाच फायदा झाला असता. परंतू प्रजासत्ताक दिनापर्यंत शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागणे हे दुर्दैव आहे. केंद्र सरकारला पुढे ते करावेच लागणार आहे, असे राऊत काही दिवसांपर्यंत म्हणाले होते. तकरी त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहेत. मैलोनमेैल पायपीट करून ते दिल्लीत, मुंबईत पोहोचलेत. भाजपाचे लोक आतूनच गुदमरले आहेत. प्रमुख लोकांनाही वाटतेय की प्रश्न सुटावा, असे राऊत यांनी सांगितले.