"राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच अशा धाडींचा वापर"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 12:47 PM2021-04-24T12:47:45+5:302021-04-24T12:52:03+5:30
Jayant Patil And Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले.
मुंबई - न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 24, 2021
ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये दिल्ली, मुंबई आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांचा समावेश; सकाळी पावणे आठपासून चौकशी सुरू. आणखी बराच वेळ चौकशी चालणार. निवासस्थानातील कागदपत्रं ताब्यात घेऊन चौकशी सुरू #AnilDeshmukhpic.twitter.com/mKALkawadT
— Lokmat (@MiLOKMAT) April 24, 2021
लवकरच आणखी एका मंत्र्याची अवस्था देशमुखांसारखी होईल; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा #AnilDeshmukhhttps://t.co/f75CojMEJd
— Lokmat (@MiLOKMAT) April 24, 2021