उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय, योगी-भाजपाचे टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:30 PM2021-07-27T14:30:39+5:302021-07-27T14:35:03+5:30

Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

In Uttar Pradesh, the NCP will form an alliance with the Samajwadi Party | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय, योगी-भाजपाचे टेन्शन वाढणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा मोठा निर्णय, योगी-भाजपाचे टेन्शन वाढणार

googlenewsNext

मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) आता सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी समाजवादी पार्टीसोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. (In Uttar Pradesh, the NCP will form an alliance with the Samajwadi Party)

एनसीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस के.के. शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात आमचा पक्ष निवडणूक लढवणार आहे. ही लढाई अनेक मुद्द्यांवरून लढवली जाईल. महाराष्ट्राप्रमाणेच इथेही आम्ही विरोधी पक्षांसोबत आघाडी करू आणि समाजवादी पक्षासोबत मिळून निवडणूक लढवू आणि भाजपाला पराभूत करू.

केके शर्मा यांनी सांगितले की, जे पक्ष समान विचारसरणीचे आहेत, त्यांच्यासोबत आम्ही आघाडी करू. सध्यातरी जागावाटपाबाबत काही चर्चा झालेली नाही. मात्र शरद पवार आणि अखिलेश यादव यांच्यांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते के.के.शर्मा म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील योगी सरकार लोकशाहीसाठी धोका आहे. यांच्याविरोधात जो कुणी आवाज उठवत आहे, त्याचा आवाज दाबला जात आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या धर्मपरिवर्तनाच्या वादावर जर कुणी आपल्या इच्छेने धर्म बदलत असेल तर त्यामध्ये काही चुकीचे नाही. मात्र आम्ही जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्याच्या विरोधात आहोत.  

Web Title: In Uttar Pradesh, the NCP will form an alliance with the Samajwadi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.