"भाजपा हा दिवाळी नाही तर जनतेचं दिवाळं काढणारा पक्ष", अखिलेश यादवांचा हल्लाबोल  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 08:45 AM2020-11-10T08:45:31+5:302020-11-10T08:47:38+5:30

Akhilesh Yadav And BJP : अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत बसपा नेते कैलास नाथ सिंह यादव यांच्यासह अनेक नेते समाजवादी पार्टीत दाखल झाले.

uttar pradesh samajwadi party akhilesh yadav bjp diwali | "भाजपा हा दिवाळी नाही तर जनतेचं दिवाळं काढणारा पक्ष", अखिलेश यादवांचा हल्लाबोल  

"भाजपा हा दिवाळी नाही तर जनतेचं दिवाळं काढणारा पक्ष", अखिलेश यादवांचा हल्लाबोल  

Next

लखनऊ - उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी बाकी आहे. मात्र आतापासून राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. समाजवादी पार्टीने (सपा) पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाला (बसपा) झटका दिला आहे. 'सपा'चे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या उपस्थितीत बसपा नेते कैलास नाथ सिंह यादव यांच्यासह अनेक नेते समाजवादी पार्टीत दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलासनाथ सिंह यादव यांच्या व्यतिरिक्त बाळकुमार पटेल, कैसर जहां, सुनील यादव, काँग्रेस नेते राम सिंह पटेल, रमेश राही, जास्मीन अन्सारी, अशफाक खान, जेडीयू नेते अरविंद सिंह पटेल, आशिष मिश्रा यांच्यासह अनेकांनी 'सपा'मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भाजपा दिवाळी साजरी करत नाही, तर जनतेला दिवाळखोरीत काढते. उत्तर प्रदेशात कोणत्याही प्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने नोटबंदी केली होती. भाजपाने देशातील जनतेची निराशा केली आणि विश्वासघात केला" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले होते. दरम्यान, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली. त्यानंतर  विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मजूर, विद्यार्थी, पर्यटक, तीर्थस्थळांवर अडकलेले यात्रेकरू या विशेष ट्रेनने घरी पोहोचले. मात्र याच दरम्यान ट्रेन तिकिटासाठी लागणाऱ्या पैशावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं होतं.

'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी याआधी काही महिन्यांपूर्वी तिकिटासाठी येणाऱ्या खर्चावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अखिलेश यांनी ट्विरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी एक ट्वीट केलं होतं. 'रेल्वेद्वारे घरी परतणाऱ्या गरीब, असहाय्य मजुरांकडून भाजपा सरकारद्वारे पैसे घेण्याची बातमी लज्जास्पद आहे. भांडवलदारांचे कोट्यवधी रुपये माफ करणारी भाजपा श्रीमंतांच्या सोबत आणि गरीबांच्या विरुद्ध आहे, हे आज उघड झालं. संकटसमयी शोषण सावकार करतात, सरकार नाही' असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं होतं.

Web Title: uttar pradesh samajwadi party akhilesh yadav bjp diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.