"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला

By बाळकृष्ण परब | Published: November 29, 2020 06:59 PM2020-11-29T18:59:10+5:302020-11-29T19:04:33+5:30

Sanjay raut : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता.

Vajpayee's NDA had 33 parties but no one called him immoral | "वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला

"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेल्या ३३ पक्षांची आघाडी होती त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हतेकोरोना विषाणू, लॉकडाऊन, पूर आणि निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आले नसती तर राज्य सरकारने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला असता

मुंबई - युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेलं वाकयुद्ध आता दिवसागणित अधिकाधित तीव्र होत चाललं आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता. भाजपाच्या या आरोपाला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेल्या ३३ पक्षांची आघाडी होती, पण त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रूपात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेस यांच्या आघाडीचा अस्वाभाविक आणि अनैतिक असा उल्लेख भाजपाने केला होता. त्यावर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये ३३ वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पक्षांची आघाडी होती. मात्र त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हते.

जर कोरोना विषाणू, लॉकडाऊन, पूर आणि निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आले नसती तर राज्य सरकारने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला असता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या छत्राखाली ३३ राजकीय पक्षांची आघाडी होती. आणि सर्वांची विचारसरणी वेगवेगळी होती. मात्र त्यावर कुणी प्रश्न उपस्थित केले नव्हते.

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली होती. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग, शेतकऱ्यांचे मुद्दे आणि विकास प्रकल्प अशा सर्व आघाड्यांवर सरकारला अपयश आले आहे.

Web Title: Vajpayee's NDA had 33 parties but no one called him immoral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.