“वसुंधरा राजेंना कोणी रोखू शकत नाही, ३ महिन्यांत टेक ओव्हर करणार”; ऑडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 19:56 IST2021-07-09T19:54:46+5:302021-07-09T19:56:04+5:30
येत्या ३ महिन्यांत वसुंधरा राजे टेक ओव्हर करणार असून, त्यांना कुणीही रोखू शकत नाही, असे इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

“वसुंधरा राजेंना कोणी रोखू शकत नाही, ३ महिन्यांत टेक ओव्हर करणार”; ऑडिओ व्हायरल
अलवर:राजस्थानमध्ये सत्तांतर झाल्यापासून भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरू झाली असून, ती अनेकदा चव्हाट्यावरही आली आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पक्ष दूर करत असल्याच्या शक्यतेवरून राजे गट सक्रीय झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा इशाराही दिल्याचे दिसले होते. आता मात्र एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये येत्या ३ महिन्यांत वसुंधरा राजे टेक ओव्हर करणार असून, त्यांना कुणीही रोखू शकत नाही, असे इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (vasundhara raje will take over in three months audio of rajasthan bjp leader goes viral)
राजस्थानमधील बानसूर येथील भाजप आमदार आणि माजी मंत्री रोहिताश्व शर्मा यांचा हा ऑडिओ असल्याचे सांगितले जात असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर आता राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे सांगितले जात आहे.
हीच ती वेळ! देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता; हायकोर्टाने केले स्पष्ट
आम्ही पक्षाच्या विरोधात नाही
शर्मा एका भाजप कार्यकर्त्याशी संवाद साधतानाचा हा ऑडिओ असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये भाजप कार्यकर्ता स्वतःला प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांच्या टीममधील असल्याचे सांगत आहे. तुम्हाला तुमची लायकी समजली ना... ठीक आहे सतीश पूनिया यांचा विजय असो.. म्हणा, यावर कार्यकर्ता म्हणतो की, आम्ही तर पिढ्यान पिढ्या भाजपशी संबंधित आहोत. यानंतर रोहिताश्व म्हणतात की, आम्हीदेखील पक्षाचेच कार्यकर्ते आहोत. आम्ही पक्षाच्या विरोधात नाही. नेतृत्वाला बाजूला सारून निवडणुका लढता येऊ शकतात का, वसुंधरा राजे यांना हटवून निवडणुका लढता येतील का, अशी विचारणा करत ३ महिन्यांनंतर वसुंधरा राजे टेक ओव्हर करतील, त्यांना कुणीही रोखू शकत नाही, असे रोहिताश्व शर्मा यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.
देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम; महाराष्ट्र, केरळमध्ये ५३ टक्के रुग्ण
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रोहिताश्व शर्मा यांना पाठिंबा देत प्रदेश नेतृत्वावर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. तसेच वसुंधरा राजे समर्थक आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. यापूर्वी सतीश पूनिया यांचे जुने बंडखोरीसंदर्भातील पत्रही लीक करण्यात आले होते.