Video: ५०, १०० नाही ६०००! भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर लोटला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 11:56 AM2020-12-02T11:56:16+5:302020-12-02T11:59:05+5:30
Corona Virus Gujarat News: कोरोना व्हायरसचे संक्रमन रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी लोकांनी लग्न समारंभ आदी कार्यक्रमांना बंधने आणली आहेत. मात्र, भाजपाचे नेते आणि तापी जिल्ह्यातील निजार मतदारसंघाचे माजी आमदार गामित यांनी गाईडलाईन्सच्या चिंधड्या उडविल्या आहेत.
गुजरातमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. रुग्ण वाढू लागल्याने ४ मोठ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे त्याच राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री कांति गामित यांच्या नातीच्या एन्गेजमेंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हजारो लोक जमले असून गरबा गाताना दिसत आहेत. कोरोना काळात केंद्राच्या आणि राज्याच्या गाईडलाईन्स धाब्यावर बसविल्याने आता टीका होऊ लागली आहे.
कोरोना व्हायरसचे संक्रमन रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी लोकांनी लग्न समारंभ आदी कार्यक्रमांना बंधने आणली आहेत. मात्र, भाजपाचे नेते आणि तापी जिल्ह्यातील निजार मतदारसंघाचे माजी आमदार गामित यांनी गाईडलाईन्सच्या चिंधड्या उडविल्या आहेत.
COVID-19 Guidelines, Rules, Laws and Curfew don't apply to BJP Leaders in Gujarat.
— Saral Patel (@SaralPatel) December 1, 2020
Video you see below is of the pre-wedding celebration of former BJP minister Kanti Gamit's granddaughter. - This when cases are rampantly rising in Gujarat. pic.twitter.com/YQHkVB0LYI
व्हिडीओ व्हायरल होताच राज्य सरकारमध्येही खळबळ उडाली असून गृह मंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी व्हिडीओचा तपास करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनीही कांती गामित यांना पोलिस स्थानकात बोलवून चौकशी केली आहे.
गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. गुजरातची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २ लाख १० हजारवर गेली आहे. यामुळे अहमदाबाद आणि सुरतसह चार महानगरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपाचेच नेते नियम मोडताना दिसत असल्याने विरोधक टीका करू लागले आहेत.
पोलिसांवरही होणार कारवाई
कांती गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचे आयोजन तापीच्या डोसवाडा गावात करण्यात आले होते. यामध्ये ६००० हून अधिक लोक गरबा खेळताना आणि त्याच्या आजुबाजुला उभे असलेले दिसत होते. या व्हिडीओत दिसणाऱ्या सर्व लोकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांवरही कारवाई केली जाणार आहे.
गामित म्हणाले १५०० ते २००० लोकांना बोलावलेले
पोलिसांनी मंगळवारी गामित यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. चौकशीत त्यांनी मुलाच्या मुलीचा साखरपुडा होता. यामध्ये १५०० ते २००० लोकांच्या जेवन केले होते. मात्र, व्हॉट्सअॅपवर लोकांना माहिती मिळाल्याने मोठी गर्दी झाली. सर्व गाव आदिवासी भागात येतो. त्यामुळे त्या लोकांना आम्ही नाही म्हणू शकलो नाही. आमच्याकडून चूक झाल्याचे मान्य आहे.