Vidhan Sabha Adhiveshan: महाविकास आघाडी संधी साधणार, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 03:33 PM2021-07-06T15:33:12+5:302021-07-06T15:33:27+5:30
Vidhan Sabha Adhiveshan: आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
मुंबई - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेले महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद अद्यापही रिक्त आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज आटोपत आहे. मात्र या अधिवेशनात राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे नियोजन केले नव्हते. (Vidhan Sabha Adhiveshan) मात्र आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. (Possibility of special assembly session for election of Maharashtra Assembly Speaker)
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही अडखळत, धडपडत वाटचाल करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
विधिमंडलाच्या पावसाठी अधिवेशनात पहिल्या दिवशी सभागृहात गोंधळ घातल्याने तसेच तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याने भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ घटले आहे. याचाही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत सत्ताधाऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र विधानसभा अध्यक्षपदाची निवड जाहीर झाल्यास भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये झालेल्या सत्तास्थानांच्या वाटपात विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण तसेच संग्राम थोपटे यांच्यासह इतर नेत्यांची नावे चर्चेत आहेत.