Vidhan Sabha Adhiveshan: ...मग तुम्हाला काय इथे भजी-वडे तळायला बसवलंय?; देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 01:50 PM2021-07-06T13:50:36+5:302021-07-06T13:53:37+5:30

Vidhan Sabha Adhiveshan Live Update: सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवाल फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला.

Vidhan Sabha Adhiveshan: ... So why are you sitting here frying bhaji-vade?; Devendra Fadnavis's question to Thackeray Government | Vidhan Sabha Adhiveshan: ...मग तुम्हाला काय इथे भजी-वडे तळायला बसवलंय?; देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल 

Vidhan Sabha Adhiveshan: ...मग तुम्हाला काय इथे भजी-वडे तळायला बसवलंय?; देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल 

Next

मुंबई - तालिका अध्यक्षांनी १२ आमदारांच्या केलेल्या निलंबनानंतर विधानसभा अधिवेशनात भाजपाने सत्ताधाऱ्यांविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. (Vidhan Sabha Adhiveshan) दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील प्रतिअधिवेशनावर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपाने माध्यमांच्या कक्षात जाऊन प्रतिविधानसभा आयोजित केली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवालही फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला. (Devendra Fadanvis Criticize Mahavikas Aghadi Government)

देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की, आम्ही विविध विषयावर प्रश्न उपस्थित करून सरकारची पोलखोल करत असल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. आज १२ वाजता प्रतिविधानसभेत मी बोलणार म्हणून मार्शलना पाठवून आम्हाला हटवण्यात आले. मात्र आमचा आवाक कुणीही बंद करू शकत नाही. सरकारला लोकशाहीची चाड नाही. मात्र आम्ही लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही विरोधात आवाज उठवत राहू. हे सरकारच सर्वच बाबतीती अपयशी ठरले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

ते म्हणाले की, या सरकारमुळे महाराष्ट्र कोरोनाची राजधानी बनली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ६० लाख रुग्ण हे महाराष्ट्रमध्ये सापडले आहेत. राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडाही मोठा आहे. त्यातही एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू हे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत झाले आहेत. आज सरकारने तीन कोटी लसींची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. मात्र आतापर्यंत राज्यात जे लसीकरण झाले त्या लसी आल्या कुठून जमिनीतून आल्या की आकाशातून पडल्या, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

या सरकारला शेतकऱ्यांचे शाप लागणार आहेत. त्यांना राजकारणात  राजकारणात जागा राहणार नाही. अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या भयानक प्रमाणात आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना नागवलं जातंय, तर वारकऱ्यांना जेरबंद केलं जातंय. मुघल, इंग्रजांना जमलं नाही ते ठाकरे सरकारनं करून दाखवलं आहे. या राज्यात खुन्यांना, बलात्काऱ्यांना अटक होत नाही. मात्र वारकऱ्यांना अटक होत आहे. काय मर्दुमकी आहे या सरकारची. पन्नासपेक्षा कमी लोकांमध्ये वारी करतो, परंपरा जपायची आहे, एवढीच मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र बंडातात्या कराडकरांना अटक करण्यात आली. आजही अनेक वारकरी नेते आणि संत पोलिसांच्या पहाऱ्यात आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी संत जनाबाईंचा अभंग एक अभंग वाचून दाखवला.
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । 
चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला

दरम्यान, प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकार करणार, कर्जमाफी केंद्र सरकार देणार, चक्रीवादळग्रस्तांना मदत केंद्र सरकार देणार, पीक विमा केंद्र सरकार देणार, राज्याचं अर्थकारण केंद्र सरकार चालवणार, मराठा आरक्षण केंद्र सरकार देणार, ओबीसी आरक्षण केंद्र सरकार देणार, पदोन्नतीतील आरक्षण केंद्र सरकार देणार, मेट्रोचं काम थांबलं तर त्या केंद्र सरकार जबाबदार ठरवणार, रेमडेसिवीर केंद्र सरकार देणार, पीपीई किट केंद्र सरकार देणार, ऑक्सिजनचा  पुरवठा केंद्र सरकार करणार, लसीकरण केंद्र सरकार सुरू करणार, असं सगळं जरतसेच आता जर सगळं काम जर केंद्र सरकारने करायचं आणि यांनी इथे केवळ वसुल्या करायच्या का. या सरकारच्या प्रत्येक विभागातला वाझे जर समोर आणला तर या सरकारमध्ये काय चाललंय ते समजेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला सत्तेवर काय भजी-वडे तळायला बसवलंय का? अशा प्रकारचे राज्यकर्तेच पाहिले नाहीत, ज्यांना आत्मविश्वास नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

Web Title: Vidhan Sabha Adhiveshan: ... So why are you sitting here frying bhaji-vade?; Devendra Fadnavis's question to Thackeray Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.