एटीएसने जप्त केलेली व्होल्व्हो देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची? राष्ट्रवादीचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 04:17 PM2021-03-23T16:17:03+5:302021-03-23T16:17:30+5:30

NCP Serious allegations on the Devendra Fadanvis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या प्रकरणावरून रोज नवनवे दावे करत महाविकास आघाडीला अडचणीत आणत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट देवेंद्र फडणवीय यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

The Volvo seized by the ATS belongs to a close associate of Devendra Fadnavis? Serious allegations by the NCP | एटीएसने जप्त केलेली व्होल्व्हो देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची? राष्ट्रवादीचा गंभीर आरोप 

एटीएसने जप्त केलेली व्होल्व्हो देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची? राष्ट्रवादीचा गंभीर आरोप 

googlenewsNext

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवसस्थानासमोर सापडलेली स्फोटके, त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze case) यांचे आलेले नाव, पुढे या प्रकरणात वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि आता परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला गंभीर आरोप यामुळे गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या प्रकरणावरून रोज नवनवे दावे करत महाविकास आघाडीला अडचणीत आणत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट देवेंद्र फडणवीय यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. (The Volvo seized by the ATS belongs to a close associate of Devendra Fadnavis?  Serious allegations by the NCP)

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करत असलेल्या एटीएसने एक व्होल्वो कार जप्त केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीने संशयाची सुई थेट फडणवीस यांच्या निकटवर्तीयाकडे वळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबूक पेजवरून यासंदर्भातील एक पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात, असा संशय या पोस्टमधून व्यक्त करण्यात आला आहे.

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून केला आहे. 

दरम्यान, नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

Web Title: The Volvo seized by the ATS belongs to a close associate of Devendra Fadnavis? Serious allegations by the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.