चार राज्यांतील मतदान दुसऱ्या टप्प्यानंतर संपणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:49 AM2019-04-18T04:49:22+5:302019-04-18T04:50:14+5:30

द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे करुणानिधी व जयललिता हे नेते नसताना या दोन्ही पक्षांच्या दुसºया फळीतील नेत्यांमध्ये येथे चुरशीची लढत होत आहे.

Voting in four states will end after the second phase | चार राज्यांतील मतदान दुसऱ्या टप्प्यानंतर संपणार

चार राज्यांतील मतदान दुसऱ्या टप्प्यानंतर संपणार

Next

चेन्नई : द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे करुणानिधी व जयललिता हे नेते नसताना या दोन्ही पक्षांच्या दुस-या फळीतील नेत्यांमध्ये येथे चुरशीची लढत होत आहे. सत्ताधारी असलेल्या अण्णाद्रमुकने भाजप समवेत आघाडी केली आहे. याशिवाय पीएमके, डीएमडीके आणि तमिळ मनिला कॉँग्रेस हे पक्षही या आघाडीमध्ये सामील आहेत. याच्या विरोधामध्ये द्रमुकने कॉँग्रेस ,डावे पक्ष, व्हीसीके, एमडीएमके आणि मुस्लीम लीग यांच्यासमवेत धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीची स्थापना केली आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर दुभंगलेल्या अण्णाद्रमुकच्या दोन गटांमध्येही आपणच सच्चे वारसदार दाखविण्याची स्पर्धा आहे. टीटीव्ही दिनकरन् यांच्या नेतृत्वाखालील एएमएमके आणि पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक यांच्यातील लढतही बघण्यासारखी आहे. याशिवाय राजकारणात आलेले अभिनेते कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम(एमएनएम) हा पक्षही प्रथमच मतदारांना सामोरा जात आहे. यामुळे येथील लढती रंगतदार ठरणाºया आहेत.
>दिग्गज नेते नसताना...
अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन पक्षांचे सर्वेसर्वा असलेले जे. जयललिता आणि एम. करुणानिधी हे नेते काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांच्या दुसºया फळीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. या निवहणुकीत या दोन्ही द्रविडियन पक्षांचे नेते नसल्याने राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.
>पुद्दुचेरी । एकमात्र जागेसाठी होणार बहुरंगी लढत
पुडुच्चेरी : या केंद्रशासित प्रदेशामध्ये सत्ताधारी असलेल्या कॉँग्रेसला आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्री नारायण स्वामी यांनी या निवडणुकीसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मागील निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या एआयएनआरसीने उमेदवार बदलला आहे. या निवडणुकीमध्ये त्यांनी के. नारायण स्वामी यांना तर कॉँग्रेसने व्ही. वैदलिंगम यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम(एमएनएम) या पक्षानेही एम.ए.एस. सुब्रमण्यम् यांना मैदानामध्ये उतरविले आहे. याशिवाय अन्य काही स्थानिक पक्षांचे उमेदवारही बहुरंगी लढत होत आहे.
>पूर्व त्रिपुरामधील मतदान आता २३ एप्रिल रोजी
नवी दिल्ली : पूर्व त्रिपुरा मतदारसंघामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या होत्या. या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री उशिरा गुरुवारी होणारे पूर्व त्रिपुरा मतदारसंघातील मतदान पुढे ढकलल्याची घोषणा केली. आता हे मतदान २३ एप्रिल रोजी होईल. याशिवाय आयोगाने त्रिपुराचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) राजीव सिंग यांची तातडीने बदली केली आहे. त्यांच्याजागी आयोगाने व्ही. एस. यादव यांची नियुक्ती केली आहे. कॉँग्रेस आणि माकपाने कायदा आणि सुव्यवस्था नसल्याच्या अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या.
>मणिपूर । भाजप आणि कॉँग्रे्रेसमध्ये थेट लढाई
इम्फाळ : मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागा असून या दोन्हीसाठीचे मतदान पूर्ण होत आहे. राज्यामध्ये भाजप आणि कॉँग्रेसने या दोन्ही जागांसाठी उमेदवार दिले आहेत. याशिवाय जेडीयू, राष्टÑवादी कॉँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांनीही आपापले उमेदवार काही जागांवर दिले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने येथील सत्ता अन्य पक्षांच्या मदतीने मिळविली आणि कॉँग्रेसकडून हे राज्य ताब्यात घेतले. या निवडणुकीमध्येही भाजप आपला विजयरथ पुढे नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे.

Web Title: Voting in four states will end after the second phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.