पाकिस्तानी मालिका बघते म्हणून पतीचे पत्नीवर वार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 08:25 PM2019-03-12T20:25:34+5:302019-03-12T20:33:06+5:30

पाकिस्तानी मालिका बघते म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याचे वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या हल्ल्यात पत्नी झाली असून स्वारगेट पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Watching the Pakistani series, on the husband' stabbed wife | पाकिस्तानी मालिका बघते म्हणून पतीचे पत्नीवर वार 

पाकिस्तानी मालिका बघते म्हणून पतीचे पत्नीवर वार 

Next

पुणे : पाकिस्तानी मालिका बघते म्हणून चिडलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याचे वार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या हल्ल्यात पत्नी झाली असून स्वारगेट पोलिसांनी पतीला अटक केली आहे. शहरातील सॅलिसबरी पार्क भागात सोमवारी ही घटना घडली.  नर्गिस आसिफ नायब असे जखमी महिलेचे नाव आहे. आसिफ नायब याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.

 आसिफ नायब यांचा होर्डींग लावण्याचा व्यवसाय आहे. तर नर्गिस या गृहिणी आहेत. या दांपत्याला दोन मुले आहेत. नर्गिस यांनी मुलगा 
 मुलगा आरिफला दुध आणण्यासाठी पाठवले होते. त्याने येताना दुधाची पिशवी फोडली. त्यामुळे आसिफ व  नर्गिस यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी त्यांनी तिला शिवीगाळ करत धमकी दिली होती. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. दरम्यान सोमवारी दुपारी त्यांची मुलगी शिकवणीला गेली होती. . त्यांनी घरात त्यांची सासू, कामवाली बाई यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर सासू वरच्या मजल्यावर गेल्या. आणि काम करणारी बाई फरशी पुसत होती तर  पती आसिफ टि. व्ही. पाहात होते. त्यावेळी नर्गिस बेडरुममध्ये जाऊन मोबाईलवर युट्यूबवर पाकिस्तानी मालिका बघत होत्या. 


अचानक संतापलेल्या आसिफ यांनी ओरडत ''तुला पाकिस्तानी ड्रामा बघू नकोस असं   सांगितलेलं कळत नाही का ?' असं विचारत कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी थेट डोक्यावर मारण्यास सुरुवात केल्यास नर्गिस यांनी वार अडवण्यासाठी हात पुढे केला. त्यात त्यांचा अंगठा तुटून पडला. त्यानंतर त्यांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे त्यांचे भाडेकरू धावत आले. त्यांनी नर्गिस यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आसिफला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.सी. उसगावकर करत आहेत.

Web Title: Watching the Pakistani series, on the husband' stabbed wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.