जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 06:08 PM2020-08-11T18:08:06+5:302020-08-11T18:09:11+5:30

नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर आता शंकरराव गडाख यांच्यावर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

water conservation minister shankarrao gadakh join shivsena today | जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केली. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा आणि विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे." 

याचबरोबर, यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, असेही ट्विट शंकरराव गडाख यांनी केले आहे.

दरम्यान, शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तसेच, नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर आता शंकरराव गडाख यांच्यावर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

Read in English

Web Title: water conservation minister shankarrao gadakh join shivsena today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.