"संधीची वाटच पाहतोय! फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 06:14 AM2021-01-04T06:14:24+5:302021-01-04T06:14:43+5:30

Ramdas Athavle News औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असल्याने, उद्धव ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे सांगता येत नाही.

We will form a new government under the leadership of devendra Fadnavis : Ramdas Athavle | "संधीची वाटच पाहतोय! फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू"

"संधीची वाटच पाहतोय! फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू"

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असल्याने, उद्धव ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे सांगता येत नाही. या संधीची आम्ही वाटच बघत असून, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पालघरमध्ये आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामांतराचा प्रश्न महत्त्वाचा नसून कोणीही वाद करू नये. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता होती. मागच्या आमच्या सरकारमध्येही ते सत्तेत सहभागी असताना त्यांनी नामांतराबाबत काहीही निर्णय घेतला नाही. सध्या नामांतरावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस कधीही आपला पाठिंबा काढून घेऊ शकते. त्यामुळे या संधीची आम्ही वाटच बघत असल्याने, आमच्या ११७ आमदारांसह देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.
यूपीएमध्ये शरद पवारांना अध्यक्षपद द्यावे, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मागणीला काँग्रेसमधून विरोध आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याने काँग्रेसमध्ये तणाव असल्याचेही आठवले यांनी सांगितले.  

वाढवण बंदरासाठी ६५ हजार कोटींची गुंतवणूक   
n वाढवण बंदर प्रोजेक्टसाठी केंद्र शासनाने ६५ हजार कोटींची गुंतवणूक केल्याने सव्वालाख लोकांना रोजगार उत्पन्न होणार आहे. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि जमिनींचा चांगला मोबदला मिळणार आहे. त्यामुळे वाढवण बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे सांगून आपला वाढवण बंदराला पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पालघरमध्ये केली.
n देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून वाढवण बंदर ओळखले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६५ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. स्थानिकांचा या वाढवण बंदराला विरोध असून मच्छीमार व्यवसायाला धोका निर्माण होणार असल्याची माझी माहिती आहे. परंतु माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, बऱ्याच वर्षांनंतर इतका महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रोजेक्ट होणार आहे. 

n वाढवण प्रोजेक्टमुळे सव्वालाख लोकांना रोजगार निर्माण होऊन स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. यात अनेकांचा फायदा होणार असून दुसरीकडे रस्त्यासाठी ५५० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
 

Web Title: We will form a new government under the leadership of devendra Fadnavis : Ramdas Athavle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.