"आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार आणि... ” चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:22 AM2021-04-06T10:22:27+5:302021-04-06T10:25:07+5:30

आगामी काळात भाजपा (BJP) पुन्हा एकदा शिवसेनेसोबत (Shiv sena) किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आघाडी करून सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

"We will not take anyone's crutches now, we will fight own in 2024 and form Government" Chandrakant Patil's big claim | "आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार आणि... ” चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा 

"आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार आणि... ” चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा 

googlenewsNext

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी असलेले महाविकास आघाडीचे सरकार कमालीचे अडचणीत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजपा (BJP) पुन्हा एकदा शिवसेनेसोबत (Shiv sena) किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आघाडी करून सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आगामी काळातील आघाड्यांबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. ("We will not take anyone's crutches now, we will fight own in 2024 and form Government" Chandrakant Patil's big claim)

आज भाजपाचा ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपाच्या कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत मोठे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार. २०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. तसेच आम्हाला कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही स्वबळावर निवडणून लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू, असा विश्वाय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळातील तिसरा राजीनामा येईल, असे भाकित केले. त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Web Title: "We will not take anyone's crutches now, we will fight own in 2024 and form Government" Chandrakant Patil's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.