West Bengal: मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा ‘डबल धमाका’; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाला देणार पुन्हा जोरदार धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 03:59 PM2021-06-13T15:59:06+5:302021-06-13T16:04:25+5:30
West Bengal Politics Between BJP & TMC: त्याचसोबत भाजपाचे जुने नेते आणि कार्यकर्ते यांनाही आपल्या ताफ्यात ओढण्याचं काम टीएमसीनं सुरू केलं आहे.
पश्चिम बंगालचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(CM Mamata Banerjee) यांचे माजी सहकारी मुकुल रॉय(Mukul Roy) यांनी टीएमसी(TMC)मध्ये प्रवेश केल्यानंतर आता राज्यातील राजकीय खेळ पुन्हा रंगू लागला आहे. मुकुल रॉय यांनी भाजपाच्या(BJP) च्या त्या नेत्यांसोबत संपर्क करणं सुरु केलंय ज्यांनी रॉय यांच्यासोबत टीएमसीला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. या नेत्यांना पुन्हा टीएमसीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
त्याचसोबत भाजपाचे जुने नेते आणि कार्यकर्ते यांनाही आपल्या ताफ्यात ओढण्याचं काम टीएमसीनं सुरू केलं आहे. सूत्रांनुसार आतापर्यंत २५ जणांची प्राथमिक यादी बनवण्यात आली आहे. तर १०० पेक्षा अधिक भाजपा नेते असे आहेत जे त्यांच्या परिसरात वर्चस्व राखून आहेत. मुकुल रॉय यांच्या भरवशावर त्यांनी टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला होता. मागील काही तासांपासून या नेत्यांशी संपर्क सातत्याने सुरू आहे. या नेत्यांना टीएमसीमध्ये पुन्हा घेण्याबाबत रणनीती आखली जात आहे.
आतापर्यंत सब्यासाची दत्ता, राजीव बनर्जी, प्रबीर घोषालसारख्या नेत्यांसोबत मुकुल रॉय यांचा फोनवरून संपर्क झाला आहे. हे नेते टीएमसीत प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. तर संकटकाळात पक्ष सोडणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेण्यावरून टीएमसी नेत्यांमध्ये मतभेद आहेत. टीएमसीमध्ये परतल्यानंतर मुकुल रॉय यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये भाजपातील नेत्यांना टीएमसीत प्रवेश देण्याबाबत चर्चा झाली. टीएमसी सोडून जाणाऱ्या नेत्यांसोबत संपर्क साधण्यात आला. भाजपाच्या जुन्या नेत्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे. मनोज टिग्गा यांच्याही नावाची चर्चा आहे.
मुकुल रॉयला भाजपात पाठवण्याची रणनीती?
मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी दावा केलाय की, मुकुल रॉय ट्रोजन घोड्यासारखे होते. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून केंद्र आणि राज्यातील नेत्यांची रणनीती माहिती करून घेतली आणि त्याची खबर ममता बॅनर्जींना दिली. ट्रोजन होर्सची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. ट्रोजन होर्स एक लाकडाचा घोडा असतो. ज्याचा वापर युद्धाच्यावेळी ट्रॉयच्या भिंतीमधील शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा युद्ध जिंकण्यासाठी केला जातो. १० वर्षाच्या असमाधानकारक कामगिरीनंतर यूनानियोच्या एका उपकरणात लाकडी घोड्याचा वापर करून ट्रॉयवर विजय मिळवला होता.
गद्दारांची घरवापसी नाही - ममता बॅनर्जी
मुकुल रॉय यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर ममता म्हणाल्या, रॉय यांना भाजपमध्ये धमक्या मिळत होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती. ते आता पक्षात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले गद्दार असून, त्यांना पक्षात परत घेणार नसल्याचे ममतांनी स्पष्ट केले.