"आम्ही चुकलो, भाजपा फ्रॉड पार्टी"; कार्यकर्ते गावभर फिरत मागताहेत जनतेची माफी; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 01:45 PM2021-06-13T13:45:37+5:302021-06-13T15:28:38+5:30

West Bengal BJP Workers Public Apology : तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत असल्याची घटना समोर आली आहे. 

west bengal bjp workers public apology to trinamool congress for support bjp in assembly election | "आम्ही चुकलो, भाजपा फ्रॉड पार्टी"; कार्यकर्ते गावभर फिरत मागताहेत जनतेची माफी; 'हे' आहे कारण

"आम्ही चुकलो, भाजपा फ्रॉड पार्टी"; कार्यकर्ते गावभर फिरत मागताहेत जनतेची माफी; 'हे' आहे कारण

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसला रामराम करून अनेक नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी ममता बँनर्जींना जोरदार धक्का दिला होता. मात्र त्यानंतर आता यातील काही कार्यकर्ते बॅकपूटवर आलेले पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालमध्येभाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत असल्याची घटना समोर आली आहे. 

बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे. भाजपाने गोड बोलून गळ घातली होती पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवं. मुकूल मंडल नावाच्या एका भाजपा कार्यकर्त्याने सांगितलं की, मी भाजपाला ओळखायला चुकलो. मला तृणमूलमध्ये परत जायचं आहे. सैथियामध्ये तर भाजपाचे 300 कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले आहेत. 

भाजपा कार्यकर्ते माफी मागत असताना दुसरीकडे भाजपाने सार्वजनिक माफिनाम्यामागे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची चाल आहे. त्यांनी या कार्यकर्त्यांना घाबरवलं आणि धमकावलं असणार आहे असं म्हटलं आहे. भाजपाचे माजी युवा मोर्चा मंडल अध्यक्षांनी आम्ही चुकून भाजपामध्ये गेलो होतो. आम्ही ममता यांच्या कामाच्या समर्थनार्थ आजच तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत आहोत. मी भाजपासाठी काहीही करू शकत नाही पण मी तृणमूलच्या विकासकामामध्ये सहभागी व्हायला जात आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) भाजपामध्ये (BJP) सामील झाले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मागच्या वर्षी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्र लिहून संघटनात्मक निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या 23 नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचाही समावेश होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि भाजपचे खासदार अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांना बुधवारी भाजपाचे सदस्यत्व देण्यात आले. याच दरम्यान काँग्रेसचे नेते हरीश रावत (Harish Rawat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक" असल्याचं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांचा हा निर्णय न समजण्यासारख्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. "जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे हे म्हणजे आमच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक आहे. हे खूपच दु:खद आणि निराश करणारं आहे. त्यांनी काँग्रेसला स्थानिक पक्ष म्हटल्याने मला आश्चर्य वाटलं. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या पक्षाविरोधात संघर्ष केला त्यामध्येच त्यांनी प्रवेश केला हे गोंधळून टाकणारं आहे" असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. 

Web Title: west bengal bjp workers public apology to trinamool congress for support bjp in assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.