व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 08:35 PM2021-02-10T20:35:08+5:302021-02-10T20:37:37+5:30
Mamata Banerjee : यापूर्वी 'काका-छीछी' च्या घोषणा आणि भाजपाचे नेते जेपी नड्डा यांना 'चड्डा, नड्डा, फड्डा' असं म्हटलेलं वक्तव्य झालं होतं व्हायरल
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका आता जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमध्ये आपला जम बसवू पाहणाऱ्या भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील आक्रमक झाल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मंगळवारी मुर्शिदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. या भाषणातील एक भाग मोठ्या प्रमाणात व्हायर होत आहे. यामध्ये त्या 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा' असं म्हणतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी याचे मीम्सही तयार केलेत.यापूर्वी सीएएचा विरोध करताना ममता बॅनर्जी यांनी 'काका-छीछी' च्या घोषणा आणि भाजपाचे नेते जेपी नड्डा यांना 'चड्डा, नड्डा, फड्डा' असं म्हटलेलं वक्तव्य व्हायरल झालं होतं.
ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मुर्शिदाबाद येथे आयोजित केलेल्या रॅलीमध्ये भाजपावर जोरदार निशाणा साधला. तसंच यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणाऱ्यांवर निशाणा साधत त्यांची तुलना मीर जाफरशी केली. "सिराजुदौलानं मीर जाफरला आपला मुकुट देऊन देशाची रक्षा करण्यास सांगितलं होतं. परंतु तो इंग्रजांसोबत सामील झाला आणि देशासोबत गद्दारी केली. काही लोकं मीर जाफर प्रमाणेच पक्ष सोडून भाजपत गेले आहेत आणि ते आता खुप आरडाओरड करत आहेत 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा, तुबां-तुबां, बंबा-बंबा' करत आहेत," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
WTF is going on!!
— Baba (@Dharmicbaba) February 10, 2021
This woman has lost her mind . Lol
Enjoy the video
Rt it too pls
pic.twitter.com/3cMPTvi9SA
"ज्यांना पकडले जाण्याची भीती होती तेच भाजपमध्ये गेले आहे. भाजप एक वॉशिंगमशीन आहे. त्यात लोकं काळी होऊन जातात आणि पांढरी होऊन बाहेर येतात. हा पक्ष बंगालचा नाही. हा पक्ष दिल्लीचा आहे. दिल्लीत दंगे करणारा हा पक्ष आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशात दंगे करणारा हा पक्ष आहे. आसाममध्ये एनआरसी करणारा हा पक्ष आहे. हा पक्ष ना हिंदूंचा आहे ना मुस्लीमांचा, ना शीखांचा आहे ना ख्रिस्ती नागरिकांचा ना जैन लोकांचा," असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.