'उठसूठ कोणीही बंगालमध्ये येतंय, चड्डा, नड्डा फाड्डा, गड्डा आलेत'; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 11:31 AM2020-12-11T11:31:46+5:302020-12-11T11:37:04+5:30
Mamta Banerjee Over JP Nadda And BJP : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. याच दरम्यान नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यातच भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर कोलकाता दौर्यात दगडांनी हल्ला करण्यात आला. यावरून भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोप केला आहे. तसेच, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. याच दरम्यान नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
ममता बॅनर्जी यांनी हे सगळं नाटक आहे. माध्यमाद्वांरे भाजपा नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच "देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे" असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे.
#WATCH They (BJP) has no other work. At times Home Minister is here, other times its Chaddha, Nadda, Fadda, Bhaddha is here. When they've no audience, they call their workers for doing Nautanki: West Bengal CM Mamata Banerjee addressing a public rally in Kolkata pic.twitter.com/uXrIyhdrj2
— ANI (@ANI) December 10, 2020
"हिटलर हा अशाच प्रकारे 'हिटलर' बनला. ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत आहेत. आपले स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत आणि माध्यमांकडे पाठवत आहेत. माध्यमांकडून हे व्हिडिओ दिवसभर चालवले जात आहेत. त्यांनी माध्यमांनाही विकत घेतलं आहे" असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. यासोबत ममता बॅनर्जी यांनी नवीन संसद भवनच्या मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला आहे. नवीन संसद भवनची आता काहीच गरज नव्हती. हा पैसा शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.
You have security personnel with you. How can someone attack you? Instead of depending on the state, you depend on central force. The attack might have been planned, I have asked Police to investigate but I won't put up with lies all the time: West Bengal CM Mamata Banerjee https://t.co/ex4V6A2ouEpic.twitter.com/lyUh5J5Zau
— ANI (@ANI) December 10, 2020
पीएम केअर्स फंडच्या मुद्द्यावरून ममतांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. पीएम केअर फंडचं काय झालं. या फंडाचं ऑडिट का झालं नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. "देशातील संघराज्याचा ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्रातील सरकारने विविध सरकारी यंत्रणांचा उपयोग केला" असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. यासोबतच कोरोनाच्या काळात नागरिकांकडून गोळा केलेला 'पीएम केअर्स फंड'मधील पैसा कुठे गेला असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच केंद्रातील सरकारच्या इशाऱ्यावर राज्य सरकार चालणार नाही असं ही म्हटलं होतं.
"आम्ही सत्तेत आल्यावर कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ"https://t.co/5jQBnQPa1l#BJP#DilipGhosh#MamataBanerjee#WestBengal
— Lokmat (@MiLOKMAT) December 4, 2020
"पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले?", ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
"पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले? या मदतीचे भवितव्य काय आहे ते कोणाला माहिती आहे की नाही? कोट्यवधी रुपयांचा पैसा कुठे गेला, त्याचा हिशेब सादर का गेला नाही, केंद्र सरकार राज्य सरकारला सल्ले देतं मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने काय केलं याबाबत कोणीही बोलत नाही" असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं होतं.
"सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विचारसरणीमध्ये मोठा फरक"https://t.co/IOdmd0KFPt#RamachandraGuha#BJP#Congress#Politicspic.twitter.com/wU0ZVhpu3M
— Lokmat (@MiLOKMAT) December 11, 2020