TMC आमदारानं लेफ्ट-काँग्रेसला सोबत येण्याचं केलं आवाहन; भाजप म्हणालं, "बदलांसाठी बंगाल..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 06:13 PM2021-02-14T18:13:05+5:302021-02-14T18:22:18+5:30
west bengal election 2021 : तृणमूल काँग्रेसच्या आमदारानं सभेदरम्यान केलं डावे पक्ष आणि काँग्रेसला सोबत येण्याचं आवाहन
येत्या काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आपलं वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसही आपली सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या एका आमदारानं भाजपचा सामना करण्यासाठी लेफ्ट आणि काँग्रेसला आपल्या सोबत येऊन निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपनंदेखील तृणमूलवर निशाणा साधला आहे.
जर खरंच डावे पक्ष आणि काँग्रेस भाजपविरोधी आहे तर त्यांनी भगव्या पक्षाच्या सांप्रदायिक आणि विभाजन करणाऱ्या राजकारणाविरोधात ममता बॅनर्जींच्या लढाईत सहकार्य करायला हवं, असं तृणमूल काँग्रेसचे नेते तापस रॉय यांनी पश्चिम बंगालमधील बांकुरामध्ये आयोजित एका जनसभेला संबोधित करताना म्हटलं. "ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा विरोध करून बंगालमध्ये अधिक धोकादायक अशा भाजपला आमंत्रित करण्याची चूक करू नये. त्रिपुरामधील स्थिती त्यांनी पाहिली पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे ठरवावं," असं तापस रॉय म्हणाले. यापूर्वीदेखील तृणमूल काँग्रेसनं डावे पक्ष आणि काँग्रेसला एकत्र येण्याचं आवाहन काही नेत्यांनी केलं होतं.
They (BJP) are saying that they'll rule Bengal. I want to tell Congressmen & Left party leaders that Arup Khan (Onda TMC MLA) will join your procession. Congress & Left can't do it alone, so they've come together: TMC MLA Tapas Roy during a rally in Bankura on Feb12 #WestBengalpic.twitter.com/MzkDwS28dl
— ANI (@ANI) February 14, 2021
भाजपकडून हल्लाबोल
"भाजपसोबत तृणमूल काँग्रेस एकट्यानं लढू शकत नाही याची कल्पना त्यांना आली आहे. त्यांना (काँग्रेस, डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेस) यांनी एकत्र लढलं पाहिजे. आम्ही बंगालमध्ये लढण्यास आणि बदल घडवण्यास तयार आहोत," अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली.