"लोकशाही निशाण्यावर असताना मी राजभवनात रबर स्टॅम्प बनून राहू शकत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 11:04 AM2020-12-12T11:04:00+5:302020-12-12T11:13:42+5:30

West Bengal Governor Jagdeep Dhankar : धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.

west bengal governor jagdeep dhankar says i can not live as rubber stamp | "लोकशाही निशाण्यावर असताना मी राजभवनात रबर स्टॅम्प बनून राहू शकत नाही"

"लोकशाही निशाण्यावर असताना मी राजभवनात रबर स्टॅम्प बनून राहू शकत नाही"

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. आपण कोणत्या एका पक्षाची बाजू घेत नसून घटनेच्या चौकटीत राहूनच आपले कर्तव्य बजावत असल्याचं राज्यपाल धनखड यांनी म्हटलं आहे. 

"आपण कोणतेही भाष्य करणार नाही, मात्र जे काही झाले ती एक चिंताजनक अशी स्थिती होती. ती एक लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहचविणारी घटना होती. तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, सकाळी जेव्हा मला भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या दौऱ्याबाबत माहीत पडले तेव्हा मी राज्याच्या डीजीपींना सकाळी आठ वाजता सावध केले होते. याव्यतिरिक्त मी राज्याच्या मुख्य सचिवांशी देखील संपर्क साधला" अशी माहिती धनखड यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना दिली आहे. 

"मी सर्वांना सकाळी 8 वाजताच्या कार्यक्रमाची माहिती दिली होती. मला 19 मिनिटांनंतर 8 वाजून 19 मिनिटांनी मुख्य सचिवांचा निरोप मिळाला. मी डीजीपींना माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर अर्ध्या तासाने हिंसक घटना घडल्याचे कळले" असं राज्यपालांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी राज्यपालांनी राज्य प्रशानाकडे बोट दाखवले. राज्याच्या प्रशासनाने व्यवस्थित काम केले नाही, असे ते म्हणाले. ममता बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागेल. जेव्हा त्या राज्यघटनेचे पालन करत नाहीत तेव्हा मला यात पडावे लागते. लोकशाही निशाण्यावर असताना मी राजभवनात रबर स्टॅम्प बनून राहू शकणार नाही असं देखील राज्यपालांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"संविधानाचे पालन झाले नाही तर माझा रोल सुरु"; प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचे संकेत?

पश्चिम बंगामध्ये राज्यपाल धनखड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची हालत बिघडलेली आहे. पश्चिम बंगालची सुरक्षा करणे माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संविधानाचे पालन करावेच लागणार आहे. कालच्या घटनेबाबत ममता बॅनर्जींनी माफी मागायला हवी. मानवाधिकाराच्या दिवशी मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आले. कालचा हल्ला हा लोकशाहीवरील डाग आहे. लोकशाहीत सर्वांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. 

यानंतर त्यांनी ममता यांना इशारा देताना ममता यांनी संविधानाचे पालन करावे, जर तसे झाले नाही तर माझा रोल सुरु होणार आहे, असा इशारा धनखड यांनी दिला आहे. राज्यात कोण बाहेरचा आणि कोत आतला असे वक्तव्य ममतांनी करू नयेत. मुख्यमंत्र्यांनी आगीशी खेळू नये. 

Web Title: west bengal governor jagdeep dhankar says i can not live as rubber stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.