"नाईट लाइफचे तारणहार मंत्रिमंडळात असताना तेथील गर्दीवर कारवाई करण्याची पालिकेची काय बिशाद?"

By बाळकृष्ण परब | Published: March 5, 2021 02:08 PM2021-03-05T14:08:26+5:302021-03-05T14:09:11+5:30

BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Aditya Thackeray : नाईट क्लबमध्ये होणाऱ्या या गर्दीवरून नाईट लाईफसाठी आग्रही असणारे राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना भाजपाने लक्ष्य केले आहे

"What is the point of the municipality taking action against the crowd when the savior of night life is in the cabinet?"BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Aditya Thackeray | "नाईट लाइफचे तारणहार मंत्रिमंडळात असताना तेथील गर्दीवर कारवाई करण्याची पालिकेची काय बिशाद?"

"नाईट लाइफचे तारणहार मंत्रिमंडळात असताना तेथील गर्दीवर कारवाई करण्याची पालिकेची काय बिशाद?"

googlenewsNext

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईमध्ये (Mumbai)कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ होत आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईमधील काही नाईट क्लबमध्ये नियम झुगारून गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Aditya Thackeray) दरम्यान, नाईट क्लबमध्ये होणाऱ्या या गर्दीवरून नाईट लाईफसाठी आग्रही असणारे राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना भाजपाने लक्ष्य केले आहे. ("What is the point of the municipality taking action against the crowd when the savior of night life is in the cabinet?")

कोरोना वाढत असतानाही मुंबईत नाईट क्लबमध्ये होत असलेल्या गर्दीबाबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, नाईट लाईफचे तारणहार राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असताना मुंबईतल्या नाईट क्लबमधल्या तुफान गर्दीवर कारवाई करण्याची मुंबई महापालिकेची काय बिशाद? पर्यावरणाच्या रक्षणासाठी नाईट क्लबची नितांत गरज असावी, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. 

दरम्यान, मुंबईतील नाईट क्लबमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही गर्दी होत असल्याचे काही वृत्तांमधून समोर आले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबईतील वरळीमधील एका क्लबमधून मनसेने फेसबूक लाइव्ह केले होते. 

गेल्या महिन्यापासून मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. गुरुवारी देखील ११०३ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंता  व्यक्त होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत असल्याने लॉकडाऊनची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: "What is the point of the municipality taking action against the crowd when the savior of night life is in the cabinet?"BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.