Pooja Chavan Suicide Case: “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”

By प्रविण मरगळे | Published: February 23, 2021 12:21 PM2021-02-23T12:21:48+5:302021-02-23T12:23:45+5:30

BJP Pravin Darekar Target Government over Sanjay Rathod trouble in Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला होत असलेल्या गर्दीवर विरोधी पक्ष भाजपाने(BJP) निशाणा साधला आहे.

"Where was Minister Sanjay Rathod for 15 days after Pooja Chavan suicide case? - BJP Pravin Darekar | Pooja Chavan Suicide Case: “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”

Pooja Chavan Suicide Case: “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”

googlenewsNext
ठळक मुद्देठाकरे सरकार संजय राठोड यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतंय, पूजा चव्हाण आत्महत्येमागे कुठलंही कारण पुढे येत नाहीगुन्हे दाखल करून अटक करण्याची आवश्यकता होती परंतु ती दिसत नाहीबंजारा समाजातील काही लोकांना घेऊन तुम्ही सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते का?

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे पहिल्यांदाच समोर आले आहेत, पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड दर्शन घेणार आहेत, मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत, अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मंत्री संजय राठोड यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे, त्याचसोबत पोहरादेवी गडावर समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे.(BJP Pravin Darekar Target CM Uddhav Thackeray over Controversy on Pooja Chavan Suicide Case, Minister Sanjay Rathod Trouble) 

संजय राठोड यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला होत असलेल्या गर्दीवर विरोधी पक्ष भाजपाने(BJP) निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) म्हणाले की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर खरंतरं मंत्र्यांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडायला हवी होती, मात्र कॅबिनेट बैठकीला महत्वाचा मंत्री गैरहजर राहतो, यवतमाळमध्ये कोरोनाचा कहर असतानाही पालकमंत्री गायब होते, मग मागील १५ दिवस मंत्री संजय राठोड नियोजन करत होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

त्याचसोबत १५ दिवस वनमंत्री संजय राठोड काय करत होते? या काळात बंजारा समाजातील काही लोकांना घेऊन तुम्ही सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते का?, सत्तेच्या जुळवाजुळवीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) हतबल झालेत का? असा प्रश्न पडतो, महाराष्ट्राच्या राजकारणात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे काळा इतिहास लिहिला जाणार आहे, शक्तीप्रदर्शन करून गुन्हेगारीला पाठबळ देण्याचा प्रकार घडतोय हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारं नाही असंही दरेकरांनी म्हटलं आहे,

दरम्यान, ठाकरे सरकार संजय राठोड यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करतंय, पूजा चव्हाण आत्महत्येमागे कुठलंही कारण पुढे येत नाही, फक्त वेळकाढूपणा सरकारकडून काढला जातोय, अद्यापही गुन्हा नोंद झाला नाही, सरकारच्या भूमिकेबद्दल लोकांच्या मनात संताप आणि चीड आहे, गुन्हे दाखल करून अटक करण्याची आवश्यकता होती परंतु ती दिसत नाही असाही आरोप प्रविण दरेकरांनी सरकारवर केला आहे.

भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे डीजीपींना निवेदन  

पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. तिने आत्महत्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला असे पोलिसांनी म्हटले आहे. तिच्या आईवडिलांनी आमची कोणाबाबत तक्रार नाही असा जबाब दिला आहे. मुळची परळी येथील असलेली पूजा चव्हाण, इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात गेली आणि तिने आत्महत्या केल्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली होती, या प्रकरणात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन संशयित मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा यासंदर्भात निवेदन दिले आहे.

Web Title: "Where was Minister Sanjay Rathod for 15 days after Pooja Chavan suicide case? - BJP Pravin Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.