"ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा"

By प्रविण मरगळे | Published: November 20, 2020 07:58 AM2020-11-20T07:58:34+5:302020-11-20T08:08:47+5:30

CM Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, BJP Kirit Somaiya News: ठाकरे परिवाराचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये भाग आहे का? पार्टनरशिप आहे का?, भाजपा नेते किरीट सोमैया यांचा सवाल

"Which is the business of Thackeray family?; CM Uddhav Thackeray should Answer - BJP Kirit Kirit Somaiya | "ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा"

"ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा"

googlenewsNext
ठळक मुद्देठाकरे व वायकर या दोन्ही परिवारामध्ये व्यावसायिक संबंध आहेत का?रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने एकंदर ४० सात बारा उतारे आहेत, त्यापैकी ३० सात बारा उतारे हे रश्मी उद्धव ठाकरे व अन्वय मधुकर नाईक परिवाराचे आहेत.जागा विकत घेण्यामागे ठाकरे परिवार व वायकर परिवाराचा उद्देश काय होता? ठाकरे परिवाराचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये भाग आहे का?

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती संदर्भात दिलेली माहिती तसेच रश्मी ठाकरे यांच्या जमीन खरेदीबाबत उपलब्ध झालेली कागदपत्रे पाहता ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.   

सोमैया यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत दिलेल्या माहितीची कागदपत्रे सादर केली. किरीट सोमैया म्हणाले की, आदित्य ठाकरे हे ३१ मार्च २०२० पर्यंत हिबिस्कस फूड एलएलपी, एलिओरा सोलर एलएलपी या कंपन्यांचे डेझिग्नेटेड  पार्टनर होते असे दिसते आहे. मंत्री बनल्यावर जवळपास ४ महिने ते एखाद्या कंपनीचे संचालक म्हणून कसे राहू शकतात? कंपनीचा डेझिग्नेटेड पार्टनर हे पद लाभाचे (ऑफिस ऑफ प्रॉफिट) नाही का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या खालापूर तालुक्यातील वैजनाथ येथील जमिनीचा उल्लेख आहे. या जमिनीचा उल्लेख करताना एकाच सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचा उल्लेख दोन वेळा करण्यात आला आहे. हा प्रकार संशयास्पद आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ठाकरे परिवार व अन्वय मधुकर नाईक परिवारासोबत ३० जमीन खरेदी करार झालेले दिसत आहेत. या सर्व व्यवहारांच्या सात बारा उताऱ्यांवर 'सदर जमीन लागवडीस अयोग्य” असं स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारांवरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे असं किरीट सोमैया म्हणाले. 

किरीट सोमैया यांनी उपस्थित केलेले प्रश्न

१) रश्मी उद्धव ठाकरे व  मनिषा रविंद्र वायकर म्हणजे उद्धव ठाकरे व रविंद्र वायकर या दोन्ही परिवारामध्ये कोणत्या स्वरूपाचे आर्थिक संबंध आहेत?

२) ठाकरे व वायकर या दोन्ही परिवारामध्ये व्यावसायिक संबंध आहेत का? त्यांची बिझिनेस पार्टनरशिप आहे का? या दोघांनी अशाप्रकारे संयुक्त व्यवहार अन्यत्र केले आहेत का?

३) रश्मी उद्धव ठाकरे यांचे कोर्लई येथील ३० जमीन खरेदीचे सात बारा उतारे आम्हांला सापडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने एकंदर ४० सात बारा उतारे आहेत, त्यापैकी ३० सात बारा उतारे हे रश्मी उद्धव ठाकरे व अन्वय मधुकर नाईक परिवाराचे आहेत.

४) हे सात बारा उतारे पाहिल्यास लक्षात येते की, ही जमीन लागवडीस अयोग्य आहे. ही जमीन सीआर झोन मध्ये आहेत का? मग या जागा विकत घेण्यामागे ठाकरे परिवार व वायकर परिवाराचा उद्देश काय होता? ठाकरे परिवाराचे उद्धव ठाकरे, रश्मी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार, प्रतिज्ञापत्रामधील माहिती बघितल्यास एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेस पडत आहे की त्यांचा व्यवसाय काय आहे? ठाकरे परिवाराचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मध्ये भाग आहे का? पार्टनरशिप आहे का?

 जनतेच्या मनात उत्सुकता आहे की मुख्यमंत्री ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय? जमीन घेणे-विकणे, बांधकाम क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या, अनेक कंपन्यांमध्ये ते संचालक होते, आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ते शेअरहोल्डिंग आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ते पार्टनर दिसत आहेत.  त्यामुळे त्यांचा  मूळ व्यवसाय काय यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माहिती जाहीर करावी अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. 

Web Title: "Which is the business of Thackeray family?; CM Uddhav Thackeray should Answer - BJP Kirit Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.