'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 08:03 PM2024-10-24T20:03:20+5:302024-10-24T20:08:51+5:30

Sangola Assembly Election 2024: महाविकास आघाडीमध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार, याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे आणि शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. 

Which party will get Sangola Assembly Constituency in Maha Vikas Aghadi? Answered by Jayant Patil | 'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."

'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला होता. विधानसभा निवडणुकीत आता सांगोला विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार जाहीर केला आहे. दुसरीकडे मविआचा घटकपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे अंतिम उमेदवार कोण असेल, याबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. आता यावर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यावेळी त्यांना सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या तिढ्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 

सांगोला मतदारसंघाचा पेच, जयंत पाटलांचे उत्तर

जयंत पाटील म्हणाले, "सांगोल्याची जागा गणपतराव देशमुख यांचे नातू बाळासाहेब देशमुख यांना मिळणे आवश्यक आहे. तिथे त्यांची चांगली ताकद आहे. शेतकरी कामगार पक्षाने त्याचा आग्रह केलेला आहे. शिवसेनेचा तिथे विद्यमान आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेचा तिथे विद्यमान आमदार असल्यामुळे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष यांची चर्चा सुरू आहे. म्हणून मी म्हटलं की, त्याला एक-दोन दिवस त्याला लागतील." 

मविआमध्ये जागांची अदला बदल होणार 

"त्यांनी (शिवसेना यूबीटी) यादी जाहीर केल्यानंतर सांगितलं की, यात काही बदल आम्ही करू. परांड्यांची जागा त्यांनी आम्हाला देऊ केली आहे. तिथली परिस्थिती बघता राहुल मोटे निवडून येतील. पाटणला देखील सत्यजित पाटणकर हे निवडून येण्याची जास्त क्षमता असलेले नेते आहेत. आमची चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत मार्ग निघेल", अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून दिलीप आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 

Web Title: Which party will get Sangola Assembly Constituency in Maha Vikas Aghadi? Answered by Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.