"हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?’’, MPSC प्रकरणावरून राज्य सरकारवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 04:22 PM2021-03-12T16:22:38+5:302021-03-12T16:23:34+5:30

Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government on MPSC Exam Issue : एमपीएससी परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळावरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

"Who is running this state? Mahavikasaghadi or the Secretariat? '', Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government | "हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?’’, MPSC प्रकरणावरून राज्य सरकारवर घणाघात

"हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?’’, MPSC प्रकरणावरून राज्य सरकारवर घणाघात

Next

मुंबई - राज्यातील एमपीएससीच्या परीक्षेवरून काल मोठा गोंधळ निर्माण झाला होता. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तर या निर्णयाविरोधात परीक्षार्थिंनी मोठे आंदोलन उभारल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना पुढाकार घेऊन परीक्षेबाबत निर्णय जाहीर करावा लागला. अखेर आज एमपीएससीची परीक्षा ही २१ मार्चला घेण्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, एमपीएससी परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळावरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.  ("Who is running this state? Mahavikasaghadi or the Secretariat? '', Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government )

हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी? असा घणाघाती सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे, असे मंत्री  वडेट्टीवार म्हणतात. याचा अर्थ राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत एवढं हे दुबळं सरकार आहे असाच होतो. हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?

दरम्यान, शरजिल उस्मानी हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याच्या घटनेवरूनही भातखळकर यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले, अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

शरजिल उस्मानीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला लक्ष्य करताना केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. 

Web Title: "Who is running this state? Mahavikasaghadi or the Secretariat? '', Atul Bhatkhalkar Criticize Thackeray Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.