पावणेतीन लाखांचे मताधिक्य कोण तोडेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:18 AM2019-04-17T01:18:00+5:302019-04-17T01:20:19+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील सहा लोकसभा निवडणुकींचा विचार केल्यास या निवडणुकांमध्ये रेकॉर्डब्रेक मताधिक्य २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले.

Who will break the statutory strength of the Panditana lakhs? | पावणेतीन लाखांचे मताधिक्य कोण तोडेल?

पावणेतीन लाखांचे मताधिक्य कोण तोडेल?

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील सहा लोकसभा निवडणुकींचा विचार केल्यास या निवडणुकांमध्ये रेकॉर्डब्रेक मताधिक्य २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. शिवसेनेचे राजन विचारे हे दोन लाख ८१ हजार २९९ मताधिक्याने निवडून आले होते. त्यांचे हे रेकॉर्ड मागील कित्येक वर्षांत कोणाच्याही नावावर नाही. त्यामुळे या निवडणुकीत कितीचे मताधिक्य मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत २० लाख ७३ हजार २५१ मतदारांपैकी १० लाख ५४ हजार ५७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५०.८७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मोदीलाटेमुळे विचारे यांचे मताधिक्य वाढले होते.


>2,81,299
एवढ्या मताधिक्याने राजन विचारे यांनी २०१४ मध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना ५,९५,३६४ मते मिळाली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संजीव नाईक उभे होते. त्यांना ३,१४,०६५ मते मिळाली होती. विचारे यांचे हे रेकॉर्ड पाच वर्षांपासून अबाधित आहे. या निवडणुकीत हे रेकॉर्ड ब्रेक होणार का?

>कोणाला, किती होते मताधिक्य
वर्ष नाव मताधिक्य
2014 राजन विचारे 281299
2009 संजीव नाईक 49020
2008 आनंद परांजपे 90872
2004 प्रकाश परांजपे 21258
1999 प्रकाश परांजपे 99683
1998 प्रकाश परांजपे 249589
1996 प्रकाश परांजपे 192637
1991 रामचंद्र कापसे 28317
1989 रामचंद्र कापसे 88289

Web Title: Who will break the statutory strength of the Panditana lakhs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.