'चहावाला पंतप्रधान होेऊ शकतो मग शेतकऱ्याचा मुलगा का नाही?'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 11:28 PM2019-04-24T23:28:55+5:302019-04-24T23:29:36+5:30
मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नांना दिली रोखठोक उत्तरे
मोखाडा : मुख्यमंत्री फडणवीस यांना चक्क पालघरात येवून माझ्या सारख्या छोट्या माणसावर टीका करावी लागली त्यांनी माझे शिक्षणही काढले मला त्यांना विचारायचे आहे जर चहावाला पंतप्रधान होवू शकतो तर मग माझ्या सारखा शेतकºयाचा मुलगा खासदार होवू शकत नाही का असा सवाल महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी मोखाड्यात विचारला. त्यांना कदाचित एका मतांच्या जोरावर मी पंतप्रधान होईल की काय याची भिती तर वाटत नाही ना असा खोचक प्रश्न ही जाधव यांनी उपस्थित केला.
महाआघाडीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात असून बविआचे अध्वक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी मोखाडा तालुक्यातील मागेच सभा घेऊन प्रचार केला होता. यानंतर मंगळवारी महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी सुर्यमाळ दुधगांव शिरसगांव खोडाळा आडोशी मोखाडा पोशेरा ब्राह्मणपाडा अशा गांवांचा दौरा करत खेडो पाडी पिंजुन काढली यावेळी प्रत्येक मतदारांच्या घरी जावून भाजप सरकारचा अनागोंदी कारभारावर टीका केली. यावेळी जाधव यांच्या सोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा होते. भुसारा यांनी यावेळी आपल्या तालुक्यात काही लोक फक्त दिसणारी असुन चमकोगिरी करून आपली दुकाने चालवीत आहेत यामुळे यांच्या भुकथापानाबळी पडू नका असे आवाहन केले.