जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरी

By प्रविण मरगळे | Published: November 16, 2020 08:02 PM2020-11-16T20:02:18+5:302020-11-16T20:04:50+5:30

Bihar CM Nitish Kumar, BJP News: एवढेच नव्हे, तर नितीश कुमार यांना मागासवर्गीय आणि महादलितांचा चांगला पाठिंबा असल्याचं भाजपाला ठाऊक आहे,

Why did BJP make Nitish Kumar Chief Minister even after winning more seats? Read Inside Story | जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरी

जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरी

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनाही नितीश कुमार यांनी केलेल्या कामांना पूरक आहेतपक्षाचा हिंदुत्व अजेंडा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा यादवांच्या भूमिकेशिवाय अपूर्ण आहे. नितीश कुमार प्रामुख्याने मागासवर्गीय नेत्यांवर लक्ष केंद्रीत करतात त्यासाठी भाजपा यादवांच्या नेतृत्वांना पुढे आणत आहे.

पटणा – बिहार निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. या निवडणुकीत जेडीयूपेक्षा भाजपाने जास्त जागा जिंकल्या तरीही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना देण्यात आलं. भाजपाने हे करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांचे चांगले संबंध मानले जात आहेत.  इतकचं नाही तर अलीकडेच दोन मोठ्या मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडल्याने जेडीयूला सोबत ठेवणं भाजपासाठी गरजेचे होते असंही म्हटलं जात आहे.

भाजपाने भलेही मुख्यमंत्रिपद नितीश कुमार यांना दिलं असलं तरी सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपाचं प्रतिनिधित्व सर्वात जास्त असेल. मागील सरकारपेक्षा यंदाच्या सरकारमध्ये भाजपाचे मंत्री जास्त असतील. यात भाजपा मागासवर्गीय आणि दलित समुदायातील अनेक नेत्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नितीश कुमार प्रामुख्याने मागासवर्गीय नेत्यांवर लक्ष केंद्रीत करतात त्यासाठी भाजपा यादवांच्या नेतृत्वांना पुढे आणत आहे. भाजपाच्या या रणनीतीने आरजेडीला घेरण्याचा प्रयत्न आहे.

भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचा हिंदुत्व अजेंडा आणि राष्ट्रवादाचा मुद्दा यादवांच्या भूमिकेशिवाय अपूर्ण आहे. बिहारमध्ये बीएसपी म्हणजे वीज, रस्ते आणि पाणी असा प्रमुख फॅक्टर आहे. ज्यावर मागील काही काळापासून खास काम केले गेले आहे. नवीन आलेलं सरकार आरोग्य, शिक्षा आणि सामाजिक विकास सुधारणेसाठी काम करणार आहे. बिहारमध्ये एनडीए स्थापन करण्यासाठी नितीश कुमारांचे योगदान मोठे आहे.

नव्या सरकारमध्ये या विषयावर भाजपाचं लक्ष

एवढेच नव्हे, तर नितीश कुमार यांना मागासवर्गीय आणि महादलितांचा चांगला पाठिंबा असल्याचं भाजपाला ठाऊक आहे, अशा परिस्थितीत पक्ष हे लक्षात घेऊन पुढे जात आहे. केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनाही नितीश कुमार यांनी केलेल्या कामांना पूरक आहेत, म्हणूनच त्यांनाही सरकारमध्ये नेण्यासाठी भाजपा पावले उचलणार आहे

नितीश कुमार यांची कसोटी लागणार

नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

Web Title: Why did BJP make Nitish Kumar Chief Minister even after winning more seats? Read Inside Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.