फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 01:01 PM2021-04-18T13:01:15+5:302021-04-18T13:04:47+5:30

Remdesivir News : पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

Why did the Leader of the Opposition go to rescue the pharma company owner? Nawab Malik again made serious allegations | फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले 

फार्मा कंपनीच्या मालकाला सोडवायला विरोधी पक्षनेते का गेले? नवाब मलिकांनी पुन्हा गंभीर आरोप केले 

googlenewsNext

मुंबई - कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येत असलेल्या रेमडेसिविरवरून (Remdesivir News) सध्या राज्यातील राजकारणामध्ये मोठा वाद रंगला आहे. त्यातच काल रात्री एका फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याने त्यावरून भाजपा (BJP) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. (Coronavirus in Maharashtra ) दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठा बोलावलेल्या या फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी विरोधी पक्षनेते का गेले होते, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. (Why did the Leader of the Opposition go to rescue the pharma company owner? Nawab Malik again made serious allegations on BJP)

नवाब मलिक म्हणाले की, काल रात्री औषधांचा साठा आहे अशी खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ही बाब समजताच विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि आमदार पराग अळवणी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना जर माहिती मिळाली तर ते तपास करतात. मग राजेश डोकानियांना सोडवण्यासाठी राज्यातले दोन दोन विरोधीपक्षनेते आणि दोन  आमदार का गेले होते. काही दिवसांपूर्वी हेच भाजपाचे नेते दीव दमणला गेले होते. रेमडेसिविरचे आम्ही आणून वाटप करू, असे त्यांनी सांगितले होते. भाजपाची लोकं साठा मिळू नये यासाठी प्रयत्न करताहेत का. रेमडेसिविरचा साठा करून स्वत; वाटण्याची किंवा विकण्याची भूमिका घेताहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.  

दरम्यान, एफडीएने रात्री आदेश दिल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना माहिती घेऊन सोडण्यात आलं. तसेच गरज वाटल्यास बोलावले जाईल असे सांगितले. पोलीस हे जनतेसाठी काम करतात. साठा असेल तर जप्त करून जनतेला देण्याचं का काम करते. मग यांना चौकशीसाठी बोलावलं तर भाजपावाले  का घाबरतात. वकिलीसाठी का जातात. देवेंद्रजी वकील आहेत. ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की संबंध असल्याने वचाव करत आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी पोलीस एफडीए कारवाई करू शकतात. मात्र फार्मा कंपनीच्या मालकाच्या बचावासाठी भाजपाचे नेते का धावून गेले, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. याच्यामागचं काय राजकारण आहे भाजपाने स्पष्ट करावं, असे आव्हानही मलिक यांनी दिले. 
 
देशात सात कंपन्यांना वितरण वितरण आणि विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील दोन कंपन्यांना परदेशात विक्रीची करण्याचा अधिकार देण्यात आले आहे. तर सतरा कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. ते उत्पादन करून या दोन कंपन्याना देऊ शकतात. या सात कंपन्यांना स्वत: उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातबंदी झाल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. आम्हाला विक्रीसाठी परवानगी द्या म्हणून महाराष्ट्र सरकारकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी ब्रुक फार्माचे राजेश डोकानिया हे दरेकरांसोबत शिंगणेंना भेटले होते. परवानगी मिळाल्यास रेमडेसिविर देऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली होती, असेही मलिक यांनी यावेली सांगितले. 

Web Title: Why did the Leader of the Opposition go to rescue the pharma company owner? Nawab Malik again made serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.