या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

By बाळकृष्ण परब | Published: February 26, 2021 02:26 PM2021-02-26T14:26:25+5:302021-02-26T14:29:18+5:30

MNS Criticize Thackeray Government : मराठीच्या मुद्यावरून आता मनसे आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

Why shouldn't Thackeray government be called non Marathi? MNS angry over denial of permission for Marathi signature program | या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

Next
ठळक मुद्देमहाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, यावर शिक्कामोर्तब झालंयआता शंका यायला लागलीय की हे सरकार अमराठी आहे की काय?आम्ही हे ठकणावून सांगतो की सर्व नियम पाळून हा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच

मुंबई - मराठीच्या (Marathi) मुद्यावरून आता मनसे (MNS) आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din ) मनसेकडून शनिवार २७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाला कोरोनाचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकाराली आहे. त्यामुळे मनसेने या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Why shouldn't Thackeray government be called non Marathi? MNS angry over denial of permission for Marathi signature program)

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून दादर येथील शिवाजी पार्क येथे मराठी स्वाक्षरी अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला काही कलाकारही उपस्थित राहण्याची शक्यता होती.  मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. तसेच पोलिसांनी आयोजक अमेय खोपकर यांना नोटिसही बजावली आहे. 

अमेय खोपकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना पोलिसांसकडून या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र आपण कोरोनाबाबतच्या सर्व सरकारी नियमांचे पालन करून कार्यक्रम करणार आहोत. मग सरकारने जी काय कारवाई करायची आहे ती करावी, असे आव्हान दिले आहे. 
 
दरम्यान, याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणाले की, कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिली आहे, त्या नियमांचे काटेकोर पालन करून मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र सरकारने या कार्यक्रमाला कोविडच्या प्रसाराचे कारण देत परवानगी नाकारलीच. सोबतच कारवाईचाही धाक दाखवला आहे. 

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडांसारख्या मंत्र्यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करतात. अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही. त्यांच्या डोळ्याच मराठी भाषा दिवस का खुपतो. महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, यावर शिक्कामोर्तब झालंय. पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागलीय की हे सरकार अमराठी आहे की काय? असा सवाल अमेय खोपकर यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही हे ठकणावून सांगतो की सर्व नियम पाळून हा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच.

Web Title: Why shouldn't Thackeray government be called non Marathi? MNS angry over denial of permission for Marathi signature program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.